परळी – हैदराबाद रेल्वे विद्युतीकरण अंतिम टप्प्यात

 परळी – हैदराबाद रेल्वे विद्युतीकरण अंतिम टप्प्यात

बीड, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): परळी ते हैदराबाद रेल्वे विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. परळी ते हैदराबाद लवकरच हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. विद्युतीकरणामुळे रेल्वे गतीने धावणार असून या माध्यमातून रेल्वे स्थानकाचा दर्जा वाढण्यासोबतच लांब पल्ल्याच्या गाडयाही सुरू होवू शकतात. Parli – Hyderabad railway electrification in final stage

यामुळे रेल्वेचा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.परळी उदगीर, बिदर ,विकाराबाद या लोहमार्गांचे रेल्वे विद्युतीकरण केले जात आहे.ही सर्व कामे प्रगतीपथावर आहेत.
पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी रेल्वे मार्ग विद्युतीकरणाची कामे रेल्वेने हाती घेतली आहेत.

परिणामी रेल्वेचे विद्युतीकरण करण्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे. विद्युतीकरणामुळे गाड्यांचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन अंतर्गत रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करण्यात येत असून हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

जानेवारी महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होईल व विद्युतीकरण झालेली रेल्वे परळीमार्गे धावतांना दिसणार आहे. The work will be completed by the month of January and the electrified train will be seen running through Parli.

ML/KA/PGB
23 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *