मुंबई मराठी पत्रकार संघात सर्व १४ जागा परिवर्तन पॅनलने जिंकल्या

 मुंबई मराठी पत्रकार संघात सर्व १४ जागा परिवर्तन पॅनलने जिंकल्या

मुंबई, दि. ३९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनेलने ऐतिहासिक विजय मिळवला. पत्रकार संघाच्या इतिहासात इतक्या मोठ्या फरकाने सर्व 14 च्या 14 जागा जिंकण्याचा विक्रम परिवर्तन पॅनेलने केला. परिवर्तन पॅनेलचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के आणि कोषाध्यक्ष जगदीश भोवड या तिघांनीही एकूण 486 मतांपैकी प्रत्येकी 300 हून अधिक मतं मिळवत दणदणीत विजय मिळवला.उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी झालेल्या सर्वाधिक चुरशीच्या लढतीत परिवर्तन पॅनेलच्या स्वाती घोसाळकर आणि राजेंद्र हुंजे यांनी बाजी मारली. कार्यकारिणीच्या 9 जागांवरही परिवर्तन पॅनेलने झेंडा फडकावला. परिवर्तन पॅनेलच्या कार्यकारिणी पदावरील प्रत्येक विजयी उमेदवाराने दोनशे पार मते मिळवली. प्रतिस्पर्धी समर्थ पॅनेलच्या एकाही उमेदवाराला दोनशे मतांचा टप्पा गाठता आला नाही.ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर हे समर्थ पॅनेलतर्फे अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या लढतीत संदीप चव्हाण यांनी तब्बल 316 मते खेचून घेत 156 मतांच्या फरकाने विजय मिळवला. खांडेकर यांना 160 मते मिळाली. कार्यवाह पदाच्या लढतीत परिवर्तन पॅनेलच्या शैलेंद्र शिर्केंनी 307 मते मिळवत समर्थ पॅनेलच्या दीपक परब (166) यांचा पराभव केला. कोषाध्यक्षपदाच्या लढतीत जगदीश भोवड यांनी सर्वाधिक 218 मतांच्या फरकाने सारंग दर्शने (166) यांचा पराभव केला. उपाध्यक्षपदाच्या दोन जागांवर परिवर्तन पॅनेलच्या ज्येष्ठ पत्रकार स्वाती घोसाळकर यांनी 288 मते तर राजेंद्र हुंजे यांनी 225 मते मिळवत बाजी मारली. समर्थ पॅनेलच्या उदय तानपाठक यांना 208 मते मिळाली तर विष्णू सोनवणे यांना 203 मते मिळाली. कार्यकारिणी पदाच्या लढतीत दिवाकर शेजवळ आणि देवेंद्र भोगले यांना सर्वाधिक 282 मते मिळाली. नाणेफेक करून त्यातील पहिल्या क्रमांकासाठी भोगले यांची वर्णी लागली.*निकाल पुढीलप्रमाणे :* अध्यक्षसंदीप चव्हाण (विजयी)- 316 डॉ. सुकृत खांडेकर (पराभूत)- 160उपाध्यक्ष- पदे 2स्वाती घोसाळकर (विजयी)- 288राजेंद्र हुंजे (विजयी)- 225उदय तानपाठक (पराभूत)- 208 विष्णू सोनावणे (पराभूत)- 202कार्यवाहशैलेंद्र शिर्के (विजयी)- 307दीपक परब (पराभूत)- 166कोषाध्यक्ष जगदीश भोवड (विजयी)– 334सारंग दर्शने (पराभूत)-126*कार्यकारिणी सदस्य – पदे 9*1. देवेंद्र भोगले (विजयी) – 2822. दिवाकर शेजवळ (विजयी) – 2823. गजानन सावंत (विजयी) -2744. आत्माराम नाटेकर (विजयी) – 2735. विनोद साळवी (विजयी) – 2726. किरीट गोरे (विजयी) – 2477.अंशुमान पोयरेकर (विजयी) – 2468. राजेश खाडे (विजयी) – 2459. राजीव कुलकर्णी (विजयी) – 23410. कल्पना राणे (पराभूत)- 18511. श्यामसुंदर सोन्नर (पराभूत)- 17412. उमा कदम (पराभूत)-17213. रवींद्र भोजने (पराभूत)-16214. नंदकुमार पाटील (पराभूत)-16115. अरविंद सुर्वे (पराभूत)-14616. संतोष गायकवाड (पराभूत)-14217. विठ्ठल बेलवाडकर (पराभूत)-11618. राजेंद्र साळस्कर (पराभूत)-10419. महेंद्र जगताप (पराभूत)-9420. केतन खेडेकर (पराभूत)-92

ML/ ML/SL

30 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *