विनेश फोगट कुस्तीच्या फायनल मध्ये , रचला इतिहास

 विनेश फोगट कुस्तीच्या फायनल मध्ये , रचला इतिहास

पॅरिस,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आलिम्पिकचा आजचा दिवस भारतासाठी संमिश्र ठरला आहे.बॅडमिंटन आणि नेमबाजीत झालेल्या पिछेहाटीनंतर भालाफेकपटू नीरज चोप्रा याने अंतिम फेरीत प्रवेश करत आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने अंतिम फेरीत प्रवेश करत पदकाच्या आशा‌ उंचावल्या.क्युबाची कुस्तीपटू गुझमन लोपेझचा ५-० असा पराभव करीत विनेश अंतिम फेरीत पोहोचली आहे.

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने आज (६ ऑगस्ट) महिलांच्या ५० किलो गटातील पहिल्या फेरीत विश्वविजेत्या युई सुसाकी हिचा पराभव केला. यानंतर तिने उपांत्यपूर्व फेरीत ओक्साना लिवाचचा ७-५ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकच्या प्री-क्वार्टर फायनल आणि क्वार्टर फायनलमध्ये चमकदार कामगिरी केली. पहिल्या प्री क्वार्टर फायनल फेरीत तिने ५० किलो वजनी गटात सध्याची ऑलिम्पिक चॅम्पियन आणि ४ वेळा विश्वविजेती युई सुसाकी हिचा ३-२ असा पराभव केला. या सामन्यात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती युई सुसाकी प्रथम आघाडीवर होती, परंतु शेवटच्या १० सेकंदात विनेशने बाजी मारली.यानंतर विनेश फोगटने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत युक्रेनच्या माजी विश्वविजेत्या ओक्साना लिवाचचा ७-५ असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. .विनेशने उपांत्यपूर्व सामना ७-५ च्या फरकाने जिंकला.

नीरज चोप्राने पात्रता फेरीत जबरदस्त कामगिरी केली. पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीट लांब भाला फेकत अंतिम सामन्यात स्थान पक्कं केलं आहे. पात्रता फेरीत आतापर्यंतच्या भारतीय भालाफेकपटूची ही सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.नीरज चोप्राने या पर्वात 89.34 मीटर लांब भाला फेकला. या थ्रोसह 90 मीटरच्या जवळ येऊन पोहोचला आहे. नीरज चोप्राने आपल्या कारकिर्दित 89.94 मीटर लांब भाला फेकला आहे. त्यामुळे फायनलमध्ये 90 मीटर लांब भाला फेकेल अशी अपेक्षा आहे.टोक्यो ऑलिम्पिकनंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्येही नीरज चोप्राकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. अशी कामगिरी करताच ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्ण पदकं मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ठरेल. तर एथलेटिक्समध्ये दुसरं पदक मिळणारा पहिला भारतीय म्हणूनही मान मिळेल.नीरज चोप्राला अंतिम सामन्यात पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीमचं आव्हान असणार आहे. त्यानेही पात्रता फेरीत जबरदस्त कामगिरी केली आहे. नदीमने 86.59 मीटर लांब भाला फेकून अंतिम फेरी गाठली.पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू 8 ऑगस्टला आमनेसामने येणार आहेत. नीरज चोप्रा सुवर्ण पदकच आणणार असा विश्वास क्रीडाप्रेमींना आहे.

भारताच्या हॉकी संघाचा उपांत्य फेरीचा सामना जर्मनीविरूद्ध आजरात्री १०.३० वाजता सुरू होणार आहे.

SL/ ML/ SL

6 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *