Paris Olympic: भारतीय महिला टेबल टेनिस संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल
पॅरिसदि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
भारतीय महिला टेबल टेनिस संघाचा आज राऊंड ऑफ १६ मध्ये रोमानियाशी सामना झाला. या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने ३-२ असा विजय मिळवला. यासह संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.श्रीजा अकुला, अर्चना कामथ आणि मनिका बत्रा यांच्या महिला टेबल टेनिस संघाने रोमानियाचा पराभव करून महिला सांघिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत भारताचे आव्हान प्रथमच असून श्रीजा, अर्चना आणि मनिका यांच्या संघाने चमकदार कामगिरी करत रोमानियाचा पराभव केला. या रोमांचक सामन्यात जागतिक क्रमवारीत ११व्या क्रमांकावर असलेल्या भारताने चौथ्या क्रमांकाचा संघ रोमानियाचा ३-२ असा पराभव केला.
या सामन्यात श्रीजा आणि अर्चना यांनी आघाडी मिळवून दिली. या भारतीय जोडीने सलामीच्या लढतीत रोमानियाच्या एडिना आणि समारा जोडीचा ३-० असा पराभव करून आघाडी घेतली होती. या भारतीय जोडीने एडिना आणि समारा यांचा ११-९, १२-१०, ११-७ अशा फरकाने पराभव केला. यानंतर मनिकाने पुढच्या सामन्यात प्रवेश केला. हा सामना होता आणि त्यांनी बर्नाडेटचा ३-० असा सहज पराभव केला.
मनिकाने बर्नाडेटचा ११-५, ११-७, ११-७ अशा फरकाने पराभव केला. अशा प्रकारे भारतीय संघाने रोमानियावर २-० अशी आघाडी घेतली होती. पहिले दोन सामने जिंकून २-० ने आघाडीवर असलेला भारतीय संघ तिसऱ्या सामन्यात पिछाडीवर पडला . श्रीजा अकुला एलिझाबेथ समारा विरुद्धच्या रोमहर्षक एकेरी सामन्यात हरली. या सामन्यात समाराने श्रीजाचा ३-२ असा पराभव केला. श्रीजा आणि समारा यांच्यातील सामना खूपच चुरशीचा होता. ज्यात समाराने शेवटी ८-११, ११-४,७-११, ११-६, ११-८ असा विजय मिळवला.
श्रीजाने सामना गमावला असला तरी भारताची रोमानियावर २-१ अशी आघाडी होती. यानंतर अर्चना कामथला चौथ्या सामन्यात बर्नाडेटविरुद्ध ३-१ असा पराभव स्वीकारावा लागला. अर्चना या सामन्यात बर्नाडेटला आव्हान देऊ शकली नाही आणि तिला ५-११, ११-८, ७-११, ९-११ ने पराभवाचा सामना करावा लागला. भारत आणि रोमानिया यांच्यातील स्कोअर २-२ असा बरोबरीत होता आणि सामन्याचा निकाल पाचव्या आणि अंतिम सामन्यात लागला. या सामन्यात मनिकाने एडिना डियाकानूचा ३-० (११-५, ११-९, ११-९) असा पराभव केला.
लक्ष्य सेनलाकांस्यपदकाची हुलकावणी
लक्ष्य सेनने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला, पण कांस्यपदकाने मात्र त्याला हुलकावणी दिली. लक्ष्य सेनपुढे मलेशियाच्या ली झी जिआचे आव्हान होते आणि पण त्याला हे आव्हान लीलया पेलता आले नाही. कांस्यपदकाच्या लढतीत भारताच्या लक्ष्य सेनने पहिला गेम २१-१३ असा जिंकला. त्यामुळे लक्ष्य सेन हा कांस्यपदकापासून फक्त एक पाऊल दूर होता. पण त्यानंतर सेनने दुसरा गेम गमावला. त्यामुळे तिसऱ्या गेमकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. तिसरा गेमही लक्ष्य सेनने गमावला आणि त्याचे पदक हुकले. लक्ष्य सेनचे पदक हुकले तर त्याची ही ऐतिहासिक कामगिरी ठरली. कारण ऑलिम्पिकच्या इतिहासात उपांत्य फेरीत पोहोचलेला तो भारताचा पहिला पुरुष बॅडमिंटनपटू ठरला आहे.
भारतीय हॉकी संघाला मोठा धक्का
ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी भारतीय हॉकी संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार डिफेंडर अमित रोहिदासवर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (FIH) हा निर्णय घेतला आहे. ब्रिटनविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रोहिदासला लाल कार्ड दाखवण्यात आले होते. ही घटना सामन्याच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये घडली. त्यानंतर जवळपास 42 मिनिटांचा खेळ शिल्लक होता. अमितच्या काठीने विरोधी खेळाडूला दुखापत झाली. 10 खेळाडूंसह खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने ब्रिटनचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.
SL/ ML/ SL
5 August 2024