गुजरातमध्ये प्रेमविवाहासाठी आई-वडिलांची परवानगी बंधनकारक

 गुजरातमध्ये प्रेमविवाहासाठी आई-वडिलांची परवानगी बंधनकारक

गांधीनगर, दि. २३ : गुजरात सरकारने विवाह नोंदणीसंदर्भात महत्त्वाचे बदल प्रस्तावित केले आहेत. या नव्या नियमांनुसार प्रेमविवाहासाठी आई-वडिलांना अनिवार्यपणे माहिती देणे बंधनकारक ठरणार आहे. म्हणजेच, आता गुपचूप किंवा घरच्यांना न सांगता लग्न करणे कठीण होणार आहे. विवाह नोंदणीपूर्वी पालकांना नोटीस पाठवली जाईल आणि त्यांची संमती घेणे आवश्यक ठरेल.

या निर्णयामागे सरकारचे म्हणणे आहे की अशा बदलांमुळे “लव्ह जिहाद”सारख्या प्रकरणांना आळा बसेल. मात्र, या नियमामुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा येईल का, यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक कायदे तज्ज्ञांचे मत आहे की विवाह हा दोन प्रौढ व्यक्तींचा वैयक्तिक निर्णय असतो आणि पालकांची संमती बंधनकारक करणे हे मूलभूत हक्कांच्या विरोधात जाऊ शकते.

यामुळे गुजरातमध्ये प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्या जोडप्यांना मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. पळून जाऊन किंवा कुटुंबीयांच्या नकळत लग्न करणाऱ्या जोडप्यांना आता कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागेल. या प्रस्तावित बदलांवर समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, पुढील काही दिवसांत यावर व्यापक चर्चा होण्याची शक्यता आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *