परळ गाव येथील बंद रस्त्यामुळे रहिवाशी हैराण, टॅक्सीने होतोय प्रचंड खर्च

 परळ गाव येथील बंद रस्त्यामुळे रहिवाशी हैराण, टॅक्सीने होतोय प्रचंड खर्च

मुंबई, दि २६
परळ गाव येथील ग.द आंबेकर मार्गावर राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या समोर भोईवाडीच्या दिशेकडे जाणारा रस्ता दुरुस्तीचे नावावर बंद ठेवला आहे. त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांना प्रचंड मनस्ताप होत असून परळ गाव ते केम रुग्णालय येथून फिरून पुन्हा भोईवाडा नाका येथे दुसऱ्या मार्गाने जावे लागत असल्याने अवाच्या सव्वा टॅक्सीवर खर्च करावा लागत आहे. त्यामुळे येथील रहिवासी तसेच स्थानिक रुग्णालयात येणारे अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक फार त्रस्त झाले आहेत. या परळ गाव येथील ग. द. मार्गावर राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे ऑफिस आणि लग्नाचा हॉल असल्याकारणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यक्रम तसेच बारसे, वाढदिवस, लग्न आणि इतर सार्वजनिक विधी दररोज सुरू असतात. तसेच याच मार्गावरून केम, वाडिया आणि टाटा कॅन्सर रुग्णालय असल्यामुळे याच मार्गावरून अनेक रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक आपल्या रुग्णाला पाहण्यासाठी तसेच उपचार घेण्यासाठी ये जा करत असतात. परंतु हा रस्ता बंद असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असून टॅक्सीला संपूर्णपणे गोल फिरवून दुसऱ्या मार्गावरून भोईवाडा कडे येण्यासाठी आवाच्या सव्वा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रस्त झाले आहेत. तरी हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा आणि पुन्हा नागरिकांसाठी खुला करावा अशी मागणी येथील रहिवासी, दुकानदार , रुग्ण आणि त्यांची नातेवाईक करत आहेत.
परळ गाव येथील ग. द. आंबेकर मार्गावरील हा रस्ता बंद असल्याचे अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाले आहेत. त्यानुसार मी
हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा यासाठी महापालिका प्रशासनाला पत्र दिले असून लवकरच या रस्त्याचे काम सुरू होईल आणि हा रस्ता नागरिकांसाठी पुन्हा खुला होईल अशी माहिती स्थानिक नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी दिली.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *