परळ येथील बेस्ट वसाहतीची चरस, गांजा ओढणाऱ्या पासून सुटका करा
माजी नगरसेवक अनिल कोकिळ यांनी दिले निवेदन    
	        
	 
					
    मुंबई, दि ३१
परळ येथील बेस्ट वसाहत येथे गेल्या अनेक महिन्यांपासून बी इमारतीच्या मागे चरस, गांजा पिण्यासाठी वसाहतीच्या बाहेरील तरुण येऊन गैरप्रकार करत आहेत. तसेच ‘पी’ आणि ‘सी’ इमारतीच्या मागे दारूचा अड्डा तयार केलेला असून सदर ठिकाणी वसाहतीच्या बाहेरील तरुण येऊन वसाहती मधील तरुण मुलांना वाईट मार्गावर नेण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. याबाबत बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष, शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल कोकिळ यांनी काळाचौकी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिंदे आणि पोलीस निरीक्षक जाधव यांना यावर त्वरीत कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
त्यानंतर तातडीने काळाचौकी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जाधव यांनी बेस्ट वसाहत येथे येऊन सदर ठिकाणची पाहणी करून लवकरात लवकर कारवाई करण्याबाबत आश्वासित केले आहे. तसेच असे प्रकार पुन्हा निदर्शनास आल्यास स्थानिक रहिवाशांनी ताबडतोब मुंबई पोलीस 100 क्रमांकावर फोन करून तक्रार करावी. पोलिसांकडून संपूर्ण सहकार्य मिळेल,असे आश्वासन यावेळी देण्यात आले. याप्रसंगी बेस्ट अलो्टीज असोसिएशनचे अध्यक्ष रुपेश पाडावे, सेक्रेटरी एकनाथ सणस, अध्यक्ष संतोष गायकवाड आणि पदाधिकारी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.KK/ML/MS
 
                             
                                     
                                    