परभणीत जोरदार पाऊस, पिकांना संजीवनी…

परभणी दि १५ — जिल्ह्यात काल रात्रीपासून वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. मागील आठवड्यापासून प्रचंड ऊन आणि गर्मी पासून दिलासा मिळाला आहे. तर खरिपाच्या सोयाबीन कापूस तूर मूग हळद पिकासाठी हे पाणी संजीवनी मिळाली आहे. दरम्यान हा पाऊस यावर्षीच्या पावसाळ्यातील सगळ्यात मोठा पाऊस आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे विहिरी , बोरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाली असून शेतात ठिकठिकाणी पाणी साचले आहे तर ओढणी, नद्या कोसळून वाहत आहेत. काही ठिकाणी ओढ्यांना पूर आला आहे.ML/ML/MS