परभणी जिल्ह्यात पूर परिस्थिती ….

परभणी दि २२ _ जिल्ह्यात सतत पाऊस सुरूच असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने घरात पाणी साचले असून पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी, वडगाव ,नावकी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा घातल्याने संपर्क तुटला तर झिरीफाटा पूर्णा मार्गावरील माटेगाव येथील पर्यायी मार्गावर पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली आहे तसेच हा पर्यायी पूल खचला असल्याने पाणी असल्यानंतर ही जड वाहनासाठी धोकादायक असल्याने पूर ओसरला तरी जड वाहने बंद केले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातून विसर्ग चालू असल्याने काल रात्री १० वाजता येलदरी धरणाचे १, ५, ६ व १० क्रमांकाचे ४ दरवाजे अर्धा मिटरने चालू राहतील. त्याद्वारे ८४३९.८८ क्युसेक्स विसर्ग पुर्णा नदीपात्रात सुरू आहे. सद्यस्थितीत वक्रव्दाराव्दारे पुर्णा नदीपात्रात ८४४० आणि विद्युत निर्मिती केंद्रातून २७०० असा एकूण १११४० एवढा विसर्ग चालू आहे. पूर्णा आणि गोदावरी नदीची पाणी पातळी वाढल्याने दुथडी भरून वाहत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तरी नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन येलदरी धरण पूर नियंत्रण कक्षाने केले आहे.ML/ML/MS