परभणी मध्ये पुन्हा पूर परिस्थिती ….

परभणी दि ७ : जिल्ह्यात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे त्रिधारा वाडी,मुरंबा,वांगी , शिवारात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे,ओढ्यांना नद्यांचे रूप आल्याने सर्वदूर जलमय झाला , वांगी,मुरंबा,त्रिधारा, त्रिधारा वाडी भागातील काही प्रमाणात पाणी ओसरत आहे.मात्र शेती पिकांचे नुकसान झाले आहे तर पुरात शेतातील प्रचंड माती खरडून गेलीय. झिरोफाटा_पूर्णा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.ML/ML/MS