येलदरी धरणाचे दरवाजे उघडले, शेतशिवारात पूर स्थिती…

परभणी दि १९ — जिल्ह्यातील सर्व भागात रात्रभर मुसळधार पाऊस पडला असून सध्याही रिमझिम पाऊस सुरू आहे . रात्री 8 वाजता येलदरी धरणाचे 8 दरवाजे 2 मीटरने वर उचलल्याने सध्या पूर्णा नदी पात्रात 64 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पूर्णा नदीच्या पुराच्या पाण्यात वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठावरील शेत शिवारांमध्ये पूर स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान धरणाच्या ठिकाणी पुराचे पाणी पाहण्यासाठी आणि रील्ससाठी नागरिकांची मोठी गर्दी वाढल्याने सुरक्षेसाठी येलदरी धरण प्रशासनाने अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी परभणी पोलिस अधीक्षकांकडे पत्रकाव्दारे केली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे कापूस पिकात आकस्मिक मर रोगामुळे कापूस पिके धोक्यात आली आहेत.ML/ML/MS