IIT मुंबईमध्ये ‘परमरुद्र’ सुपरकॉम्प्युटर कार्यान्वित
मुंबई, दि. १० : IIT मुंबईत देशांतर्गत तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक ‘परमरुद्र’ सुपरकॉम्प्युटर param rudra supercomputer सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही प्रणाली सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग (सी-डॅक) यांच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे. परम सुपरकॉम्प्युटरमुळे आयआयटी मुंबईतील सुमारे २०० हून अधिक प्राध्यापक आणि १ हजार २०० विद्यार्थी तसेच देशभरातील संशोधकांना प्रगत संगणकीय संशोधनासाठी मोठी मदत होणार आहे.
‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेला ‘परम रुद्र’ हा सी-डॅकने स्वदेशी पातळीवर डिझाइन केलेल्या सर्व्हर्सवर आधारित आहे. या प्रणालीत सी-डॅकचा स्वदेशी सॉफ्टवेअर वापरण्यात आला आहे. ३ पेटा फ्लॉप्स क्षमतेची ही उच्च कार्यक्षम संगणकीय प्रणाली राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत बिल्ड ॲप्रोच पद्धतीने विकसित करण्यात आली आहे. यामध्ये ऊर्जा कार्यक्षमतेसाठी डायरेक्ट कॉन्टॅक्ट लिक्विड कुलिंग तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले.
SL/ML/SL