पापडी च्या दाण्यांची भाजी

 पापडी च्या दाण्यांची भाजी

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

१ वाटी शेपु ची भाजी स्वच्छ धुवुन चिरुन घ्यावी..
१ वाटी सुरती पापडीचे दाणे.
२ मोठे बटाटे.
अर्धी वाटी ओले खोबरे+२ हिरव्या मिरच्या+अर्धा इंच आले+अर्धा चमचा जिरे हा मसाला थोडेसे पाणी घालुन वाटुन वाटुन घ्यावा.
फोडणी साठी अर्धी वाटी तेल्,मोहोरी, जिरे,हिंग व हळद.
तिखट व मीठ चवीनुसार्,गरम मसाला १ चमचा.

सुरती पापडीचे दाणे थोड्या पाण्यात बोटानी दाबले जातील इतकेच उकडुन घ्यायचे.अगदी नरम करायचे नाहीत.
बटाटे उकडुन साले काढुन मध्यम आकाराच्या फोडी कराव्या.
तेलाची फोडणी करुन त्यात जिरे-मोहोरी-हिंग्-हळद घालावे लगेचच वाटण घालुन परतावे.
मसाला परतला गेला कि त्यात शेपुची भाजी,पापडी दाणे व बटाटा फोडी घालुन परतावे.
तिखट्-मीठ्-मसाला घालुन पुन्हा एकदा परतावे.
कढईवर झाकण ठेवुन त्यात थोडेसे पाणी घालुन मध्यम आचेवर एक वाफ येवु द्यावी.
एक छान वेगळ्या चवीची भाजी तयार झाली.

Papadi seeds vegetable

ML/ML/PGB
9 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *