पानशेत आणि खडकवासला धरणातून विसर्ग सुरू
पुणे, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पानशेत धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ आणि पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे सकाळी ८.०० वा. पानशेत धरणाच्या सांडव्यावरून ६ हजार ६९३ क्यूसेक तसेच विद्युत निर्मिती गृहद्वारे ६०० क्यूसेकसेक असा एकूण ७ हजार २९३ क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात येत आहे.
पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानूसार विसर्ग कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत असे उप अभियंता, मुठा कालवा पाटबंधारे विभाग पुणे यांनी सांगितले आहे.
त्याचप्रमाणे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणार विसर्ग वाढवून सकाळी ९ वाजता १३ हजार ९८१ क्यूसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानूसार विसर्ग कमी/जास्त करण्याची शक्यता आहे असेही कळविण्यात आले आहे.
ML/ML/PGB
31 July 2024