कॉम्रेड गोविंद पानसरे खून खटल्यातील तिघांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

कोल्हापूर दि १४ : ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्याप्रकरणी संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे यांना आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमुर्ती शिवकुमार दिगे यांच्याकडून जामीन मंजूर करण्यात आला.
गेल्या दहा वर्षांपासून हा खून खटला सुरू आहे एसआयटीच्या तपासावर मुंबई उच्च न्यायालयाने अनेकदा ताशेरे ओढले होते मात्र आज या खटल्यातील तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पानसरे यांच्यावर कोल्हापुरातील ऍस्टर आधार हॉस्पिटल आणि त्यानंतर मुंबईत उपचार करण्यात आले मात्र चार दिवस चाललेली मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली आणि 20 फेब्रुवारी 2015 रोजी गोविंदराव पानसरे यांचं निधन झालं.
याप्रकरणी पोलिसांनी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे यांना याप्रकरणी नेमलेल्या एसआयटीने अटक केली होती. एसआयटीच्या तपासावर पानसरे कुटुंबीयांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेत कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक एटीएस कडे सोपवावा अशी मागणी केली होती यानुसार 2022 मध्ये उच्च न्यायालयाने हा तपास एटीएसकडे दिला यावर उच्च न्यायालय देखरेख करत होतं.ML/ML/MS