राज्यात बेकायदा किडन्या विक्रीप्रकरणात विशेष चौकशी पथक स्थापन

 राज्यात बेकायदा किडन्या विक्रीप्रकरणात विशेष चौकशी पथक स्थापन

मुंबई दि. २५ : राज्यातील एकोणीस नाही तर नऊ लोकांच्या किडन्या बेकायदेशीर पणे काढण्याच्या घटना घडल्या आहेत, त्यावर सखोल चौकशी करण्यात येत आहे, सर्व संबंधित लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.

याबाबतची लक्षवेधी सूचना अतुल भातखळकर यांनी उपस्थित केली होती त्यावर विजय वडेट्टीवार, अर्जुन खोतकर, योगेश सागर यांनी उपप्रश्न विचारले. चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची अशीच किडनी काढून घेतल्या प्रकरणी सहा बेकायदेशीर सावकारांना अटक करण्यात आली, त्यातील दोन मध्यस्ताना ही अटक करण्यात आली आहे, यात तामिळनाडू आणि दिल्लीतील दोन डॉक्टरही सामील असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहितीही राज्यमंत्र्यांनी दिली. या सर्व प्रकरणात विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून सखोल चौकशी करण्यात येईल असं ही भोयर यांनी स्पष्ट केलं.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *