पाण्याची टाकी कोसळून सहा मृत्यू , सात गंभीर जखमी
नागपूर दि १९ : नागपूरमधील अवादा कंपनीच्या आवारात पाण्याची टाकी कोसळल्यानं झालेल्या अपघातात सहा कामगारांचा आज मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. नागपूर-चंद्रपूर महामार्गालगतच्या बुटीबोरी एमआयडीसी परिसरात ही घटना घडली. या अपघातानंतर पाण्याच्या टाकीच्या बांधकामात वापरल्या जाणाऱ्या धातूच्या पत्र्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
पाण्याच्या टाकीची चाचणी सुरू असताना हा अपघात झाला अशी माहिती नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. नागपूर ग्रामीण पोलिस सध्या घटनेचा तपास करत आहेत. अवादा कंपनीच्या परिसरातील सर्व पाण्याच्या टाक्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत आणि तपासणी पूर्ण झाल्यानंतरच पाणी पुन्हा भरलं जाईल असं पोलिसांनी सांगितलं.ML/ML/MS