मराठवाड्यातील दाहक वास्तव मांडणाऱ्या ‘पाणी’ चित्रपटाचा टिझर लाँच

 मराठवाड्यातील दाहक वास्तव मांडणाऱ्या ‘पाणी’ चित्रपटाचा टिझर लाँच

मुंबई, दि. १५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्यातील पाणी प्रश्न मांडणारा एक विशेष चित्रपट अभिनेता‌ आदिनाथ कोठारे याने दिग्दर्शित केला आहे.या चित्रपटाच्या टीमने लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेत आज ‘पाणी’ चित्रपटाचा टिझर लाँच केला.
मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या ‘जलदूता’च्या जीवनाला प्रेरित होऊन, सत्यघटनेवर आधारित ‘पाणी’ चित्रपट येत्या 18 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स, कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून त्यातील आदिनाथ कोठारेचा लूक समोर आला आहे.

आदिनाथ कोठारे दिग्दर्शित या चित्रपटात हनुमंत केंद्रे यांची भूमिका आदिनाथ कोठारे स्वतः साकारणार असून यात रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशा दमदार कलाकारांची मांदियाळी असणार आहे. ‘पाणी’ची कथा नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची असून नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॉ. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.

SL/ ML/ SL

15 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *