पनीर ग्रेव्ही रेसिपी

पनीर ग्रेव्ही रेसिपी
मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मसाले आणि दहीसह समृद्ध आणि मलईदार पनीर रेसिपी तयार करण्याचा हा एक अत्यंत लोकप्रिय आणि स्वादिष्ट मार्ग आहे
लागणारे जिन्नस:
● पनीर २०० ग्राम
● दोन मध्यम कांदे
● एक छोटा टोमॅटो (ऑप्शनल)
● काजू ५-६
● मनुका २०-२५
● हिरव्या मिरच्या २
● हिरवी इलायची २
● जीरे पावडर पाव छोटा चमचा
● गरम मसाला पावडर अर्धा छोटा चमचा
● मध्यम तेज पत्ता
● अर्धा इंच दालचिनी
● फोडणी साठी तेल
● बटर एक चमचा
● कसुरी मेथी
● मीठ
● पाणी
क्रमवार पाककृती:
● कांदे दहा मिनिटं कच्चा वास जाईपर्यंत उकळून थंड होऊ द्यावे
● मिक्सर जारमधे उकडलेले कांदे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, इलायची, काजू, मनुके, जीरे पावडर, गरम मसाला पावडर पेस्ट करून घ्यावी
● कढईत तेल गरम करून तेजपत्ता,दालचिनी टाकून, वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.
● मिक्सर जार विसळून तितकेच पाणी कढईत घालावे.
● एक उकळी आली कि पनीर चे तुकडे घालावेत.
● शेवटी कसुरी मेथी आणि बटर घालावे. Paneer Gravy Recipe
PGB/ML/PGB
24 Sep 2024