पंढरपूर ते लंडन आंतरराष्ट्रीय दिंडीचे नागपुरात स्वागत…

नागपूर दि १७– पंढरपूर वरून लंडन साठी निघालेली दिंडी नागपूरात दाखल झाल्यानंतर नागपुरातील विष्णुजी की रसोई बजाजनगर येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पंढरपूरहून पांडुरंगाच्या पादुका घेऊन ही दिंडी देहू, आळंदी, पुणे, छत्रपती संभाजीनगर असा प्रवास करीत काल नागपूरात दाखल झाली. सर्व ठिकाणी पालखींचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. पादुकांच्या रूपाने प्रत्यक्ष पांडुरंगच अवतरीत झाल्याचा भास साऱ्या भाविकांमध्ये दिसत होता.
याप्रसंगी कीर्तन, गायन आणि चित्र भक्तीच्या माध्यमातून पांडुरंगाच्या चरणी सेवा अर्पण करण्यात आली हभप मृण्मय कुलकर्णी यांनी यावेळी सुश्राव्य कीर्तन सेवा सादर केली. अभंग आणि भक्तिगीते देखील सादर करण्यात आली. धृपद गाडे या चित्रकाराने श्रीविठ्ठलाचे चित्र रेखाटत आपली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण केली. 18 एप्रिल ला दिंडी भारतातून नेपाळमध्ये प्रवेश करेल व पुढे चीन, रशिया, युरोप असा 22 देशातून 70 दिवसात 18 हजार किलोमीटर एवढा प्रवास करत कारने या पादुका लंडन येथे पोहोचणार आहेत.
ML/ML/PGB 2025