अवकाळीसाठी पंचनामे युद्ध पातळीवर सुरू
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना योग्य ती मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली.Panchname for Awakali started on war level
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे १ लाख ३९ हजार २२२ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची प्राथमिक आकडेवारी आहे , दोन दिवसात अंतिम आकडेवारी प्राप्त होईल असं सांगत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
विधानपरिषदेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेदरम्यान उपस्थित मुद्द्यांना उत्तर देताना ते बोलत होते.
बोगस बियाणी ,खते पुरवठा करणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी या चर्चेला उत्तर देताना सांगितलं.
ML/KA/PGB
20 Mar. 2023