पंचगंगा नदी इशारा पातळी कडे , ७९ बंधारे पाण्याखाली

 पंचगंगा नदी इशारा पातळी कडे , ७९ बंधारे पाण्याखाली

पंचगंगा नदी इशारा पातळी कडे , ७९ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कृष्णा, पंचगंगा नदीच्या पुराच्या संभाव्य धोक्याच्या पातळीच्या अनुषंगानं आज पहाटे अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग सव्वा लाख क्यूसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. पंचगंगा नदीची वाटचाल इशाऱ्याकडे झाली असून आज सकाळी सात वाजता पाणीपातळी ३७ फुटांवर आहे, इशारा पातळी 39 तर धोका पातळी 43 फूट आहे.

७९ बंधारे पाण्याखाली गेले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 28 मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच नद्यांचे पाणी पात्रा बाहेर
पडल्याने वाहतुकीचे मार्ग बंद झाले आहेत. राज्य मार्ग ५, प्रमुख जिल्हा मार्ग ११,तर ग्रामीण मार्ग १२ अशा २८ मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे.गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरण आणि पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पंचगंगा, वारणा, कृष्णा, भोगावती,वेदगंगा, दूधगंगा, घटप्रभा, कासारी, आदी
नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलं आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ७९ बंधारे आणि
अनेक मार्ग पुराच्या पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

पंचगंगा नदीचं पाणी
पात्राबाहेर पडलं आहे. पंचगंगा घाट पाण्याखाली जाऊन मंदिरांना पाणी लागले आहे.
आजही पावसाचा जोर
जिल्ह्यात आज पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुराच्या पाण्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. पावसाचा जोर वाढल्याने कासारी मध्यम प्रकल्पाच्या विसर्गासह चार लघू प्रकल्प ओसंडून वाहू लागले.

पोर्ले- माजगाव, परखंदळे गोठे
पुलावर पाणी आल्याने प्रशासनाने वाहतूक बंद केली आहे. सावर्डे-कांदे बंधारा पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
घटप्रभा, जंगमहट्टी, जांबरे, कोदे धरण आणि लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत.

राधानगरीतून प्रतिसेकंद १४५०, घटप्रभामधून ८४३४,
वारणा धरणातून १३९६,
तर कोदेमधून ८१८ घनफूट
पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
त्यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदीची पातळी झपाट्याने वाढत असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पंचगंगा नदी धोका पातळीकडे जाण्याचा धोका आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Panchganga river nears alert level, 79 dams under water

ML/ML/PGB
21 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *