त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सवात उजळला पंचगंगा घाट
कोल्हापूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापुरात आज पहाटे विलोभनीय, नयनरम्य त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव संपन्न झाला. यानिमित्ताने आज सोमवारी पहाटे पंचगंगा घाट उजळून निघाला. कोल्हापुरातील सर्व मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला.
कात्यायनी मंदिरात हजारो दिवे लावण्यात आले होते.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मध्यरात्रीनंतर पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सवाला सुरुवात झाली. आज सोमवारी पहाटे नदी घाट उजळून निघाला.यासोबतच
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त
मध्यरात्रीनंतर पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सवाला सुरुवात झाली.
हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक आणि
नागरिक पंचगंगा नदी घाटावर जमले होते.
या रात्री पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सवाचा सोहळा सुरू झाला.
आज पहाटे हजारो भाविक पंचगंगा नदीला दीप अर्पण करण्यासाठी जमले होते.
बोचऱ्या थंडीतही सहकुटुंब अनेकांचा सहभाग होता.
फुलांचे गालिचे, सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या रांगोळ्या, देवदेवतांच्या प्रतिमांचे पूजन यामुळे नदी
घाटावर अत्यंत भक्तिमय वातावरणात हा सोहळा रंगला.
कसबा बावडा,
शिंगणापूर घाट, रंकाळा तलावासह शहरातील सर्वच
मंदिरं आणि आसपासचा परिसर दीपोत्सवामुळे उजळून निघाला होता.
कात्यायनी देवस्थान आणि मैत्री हायकर्स यांच्या पुढाकारातून कात्यायनी मंदिर, अमृत कुंड, तुलसी वृदांवन,परशुराम तीर्थ, हनुमान मंदिर, रेणुका
मंदिर, दत्त मंदिरा भोवती काल सायंकाळी दीप लावण्यात होते. त्रिपुरारी पौर्णिमा रविवारी दुपारनंतर सुरू होते. दीपोत्सवासोबत आतषबाजी, मंदिरांना
पुष्परचना करण्यात आल्या होत्या. सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल होती. Panchganga ghat lit up during Tripurari Poornima festival
ML/KA/PGB
27 Nov 2023