पंचगंगेच्या पुराला उतार
कोल्हापूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला असून आज सकाळी 11 वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी 39. 7 फूट इतकी होती.काही धरणांचा विसर्ग सुरू असल्यानं पंचगंगा आणि वारणा नदीच्या पुराचं पाणी संथ गतीनं कमी होत आहे.
18 बंधारे खुले असून त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू आहेत. 37 बंधारे अद्याप पाण्याखाली त्यामुळे इतर जिल्हा मार्ग 11 आणि 19 ग्रामीण मार्ग बंद असल्याने अद्यापही वाहतूक काहीशी विस्कळीत आहे. Panchganga floodplain
पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सेवा रस्त्यावर आलेल्या पाण्याच्या पातळीत काहीही घट झाली आहे. कोल्हापूर गगनबावडा अद्याप ठप्पच असून कोल्हापूर शहरातील काही भागांना पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव पूर्ण क्षमतेनं भरून ओसंडून वाहू लागला आहे.
कडवी धरण ही भरलं असून 845 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून 6 हजार 788 क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे जिल्ह्यातील 15 धरणांपैकी जुलै महिन्यातच भरलेलं हे पाचवं धरण आहे. यापूर्वी जिल्ह्यातील घटप्रभा, जांबरे, कोदे, राधानगरी ही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत.
राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा खुला झाला आहे. धरणातून 2 हजार 828 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
अलमट्टी धरणात 90.33 टीएमसी पाणीसाठा झाला असून 75 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे कोल्हापूरचा पूर झपाट्यानं ओसरण्यास मदत होत आहे. कोदे आणि कुंभी धरणाचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.
ML/KA/PGB
30 July 2023