पंचगंगेने ओलांडली इशारा पातळी

 पंचगंगेने ओलांडली इशारा पातळी

कोल्हापूर दि २० — गेल्या चार – पाच दिवसांपासून जिल्हयात सर्वदूर पावसाची संततधार सुरु आहे ,आज काही प्रमाणात पावसाचा जोर ओसरला. तथापी पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असल्याचे दिसून आले . दुपारी 3 वाजता दैनंदिन पाणी पातळी अहवालानुसार सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 40 . 8 फूट इतकी आहे .

जिल्हयात काही ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे ग्रामीण भागातील काही रस्ते अजूनही बंद आहेत तर काही ठिकाणी नद्या,ओढे आणि नाले यांच्या पात्राबाहेर पाणी आले आहे .सध्या जिल्ह्यात एकूण 79 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत . पंचगंगा नदीची 43 फूट इतकी धोक्याची पातळी आहे . पावसाचा जोर ओसरल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही .

जिल्हा व लगतच्या जिल्हयामधून मोठ्या प्रमाणावर धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु आहे . पंचगंगा या प्रमुख नदीसह जिल्हयातून वाहणाऱ्या इतर नदयांमध्ये विसर्ग चालू असून या विविध धरणातील विसर्ग पुढील प्रमाणे —

राधानगरी – 5784 क्युसेक
दूधगंगा – 25000 क्युसेक
वारणा – 34257 क्युसेक
कोयना – 95300 क्युसेक
अलमट्टी – 250000 क्युसेक
हिप्परगी – 82800 क्युसेक

पंचगंगेने इशारा पाणी पातळी ओलांडली असल्याने नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे .ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *