घोलवडच्या चिकूची वारी आता थेट इंग्लंड पर्यंत

 घोलवडच्या चिकूची वारी आता थेट इंग्लंड पर्यंत

पालघर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पालघर जिल्ह्यातलं घोलवड क्षेत्र हे चिकू या फळासाठी सुप्रसिद्ध आहे. कॅल्शियम समृद्ध मातीपासून प्राप्त झालेल्या पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या घोलवडच्या सुप्रसिद्ध आणि अद्वितीय गोड चिकूला आता जी.आय. मानांकन प्राप्त झालं आहे. त्यामुळे या जीआय प्रमाणित उत्पादनाच्या निर्यातीला आता मोठा वाव मिळाला आहे. इथला प्रसिद्ध चिकू आता साता समुद्रा पार पोहचला असून तो इंग्लंडला रवाना झाला आहे.
पालघर जिल्ह्यात जवळपास पाच हजार हेक्टर जमीन क्षेत्रात चिकूची लागवड करण्यात येते. आणि इथं 5 हजारा पेक्षा जास्त शेतकरी चिकूचं उत्पादन घेत आहेत. त्यातले 147 ते 150 शेतकरी असे आहेत कि, ज्यांना जी.आय प्रमाणपत्र मिळालेलं आहे.अशा जी.आय प्रमाणित चिकू बागायतदारांना आता चिकूची मागणी आल्यास सोनेरी दिवस येवू शकतील.
Therefore, the export of this GI certified product has now got a big boost. The famous Chiku has now crossed the Sata Sea and is bound for England.
आता 200 किलो चिकूचा पहिला स्लॉट नमुना म्हणून इंग्लंडमध्ये पाठवण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून चिकू हा व्यापाऱ्यांकडे आला. आणि मग व्यापाऱ्यांनी निर्यातीसाठीच्या चिकूची विभागणी आणि प्रतवारी करून ते नवी मुंबई , वाशीला केबी एक्सपोर्ट कंपनीकडे पाठवले. आणि तिथे ते तपासून त्यांची पॅकिंग करून केबी एक्सपोर्ट मार्फत हे चिकू इंग्लंड ला निर्यात करण्यात आल्यानं घोलवडचा प्रसिद्ध चिकू आता थेट सातासमुद्रापार पोहोचलाय.
डहाणू, घोलवड चा चिकू दिल्ली, पंजाब, हरियाणा, नागपूर या भागात मोठ्याप्रमाणात जात आहे. त्यानंतर इथल्या चिकूला दुबई, कुवैत सारख्या आखाती देशांमध्ये ही मोठी मागणी आहे. मात्र नुकतीच इथल्या चिकूला युके कडून मागणी आल्यानं आता घोलवडचा चिकू सातासमुद्रा पार युरोपात पोहचलाय. त्यामुळे बागायतदारांना सोनेरी दिवस येणार असल्याचं शेतकरी तथा महाराष्ट्र राज्यचिकू उत्पादक संघाचे सेक्रेटरी मिलिंद बाफना यांनी सांगितलं.
हा पहिला प्रयत्न यशस्वी झाला आणि तिथून चिकूची मागणी वाढली तर इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना मोठा फायदा होवू शकतो. कारण आम्हालाभाव चांगला मिळाला तर आम्ही शेतक-यांकडून जास्त किंमतीला घेवू शकतो असं चिकू व्यापारी अमित अग्रवाल यांनी सांगितलं.
घोलवडचा प्रसिद्ध चिकू टिकवायचा असेल तर त्याला मार्केट व्यवस्था उपलब्ध होणं गरजेचं आहे.केंद्र सरकारनं पुढाकार घेत काही महिन्यांपूर्वी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या सहकार्यानं घोलवडच्या चिकूसाठी किसान रेल्वे सुरू करण्यात आली. त्यानं इथल्या चिकू बागायतदारांना मोठा दिलासा मिळाला. मात्र आता या चिकूला युके मध्ये मागणी आल्यानं इथल्या चिकू बगायतदारांना सुगीचे दिवस येतील हे मात्र नक्की.
The Gholwad area of ​​Palghar district is well known for its Chiku fruit. The well-known and unique sweet chickpea of ​​Gholwad in Dahanu taluka of Palghar district, obtained from calcium rich soil, is now G.I. Rating received.
ML/KA/PGB
14 Jun 2021

mmc

Related post