पालक आणि मेथीची भाजी
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
पालक चिरलेला – २-३ वाट्या
चिरलेली मेथी मूठभर किंवा मेथी दाणे/डाळ कुटून अर्धा चमचा – किंवा कसुरी मेथी अर्धा चमचा
लाल मिरच्या ४
आले लसूण पेस्ट अर्धा – ते १ चमचा
कढिपत्ता – ५-६ पाने
दही किंवा आंबट ताक दीड वाटी
बेसन २-३ चमचे
तेल, फोडणीचे साहित्य.
मोहरी , भरपूर जिरं, कढिपत्ता आणि लाल मिर्च्या घालून फोडणी करावी. त्यात आले लसूण, पालक आणि मेथी/ मेथीची डाळ घालून जरासेच परतावे. आले लसणाचा कच्चट वास गेला की लगेच ताक आणि बसनाचे मिश्रण त्यात घालावे. नीट हलवून लागेल त्याप्रमाणे पाणी घालावे आणि उकळी आणावी. ताज्या मेथीऐवजी कसुरी मेथी वापरणार असाल तर तीही या स्टेज ला घालावी. मीठ आणि साखर घालावे.
PGB/ML/PGB
18 Aug 2024