भारताकडून धडक कारवाई पाकमधील एअर डिफेन्स सिस्टीम केली नष्ट

भारताने पाकिस्तानविरुद्ध निर्णायक कारवाई करत लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केली आहे. हा हल्ला भारताच्या ऑपरेशन सिंदूर चा एक भाग असून, पाकिस्तानच्या वाढत्या घुसखोरीला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आला आहे. पाकिस्तानने भारताविरुद्ध ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, लुधियाना, चंदीगड आणि भुज यांसारख्या ठिकाणी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतीय संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानच्या सर्व हल्ल्यांना अयशस्वी करून त्यांना तीव्र प्रत्युत्तर दिले.

भारतीय हवाई दलाने S-400 Sudarshan Chakra एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम चा प्रभावी वापर करत पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केली. हा हल्ला यशस्वी ठरल्यामुळे पाकिस्तानच्या हवाई संरक्षण क्षमतेत मोठी कमतरता निर्माण झाली आहे, ज्यामुळे त्यांना भविष्यात अधिक आव्हाने उभी राहू शकतात.

याशिवाय, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला, ज्यामध्ये १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार तीव्र केला, ज्यामुळे १६ भारतीय नागरिकांना जीव गमवावा लागला. भारताने युद्ध वाढवण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले, परंतु देशाच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली जातील, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *