पाकिस्तानी गुंतवणूकदारांचे 78 हजार कोटींचे नुकसान

 पाकिस्तानी गुंतवणूकदारांचे 78 हजार कोटींचे नुकसान

इस्लामाबाद, दि. 13 : इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चा फिस्कटली आहे, पाकिस्तानात झालेल्या या चर्चेनंतर कोणताही करार झालेला नाही. या चिंकाजनक बातमीमुळे जगभरातील शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये 4 टक्क्यांहून अधिक घसरण झाली, त्यामुळे पाकिस्तानी गुंतवणूकदारांचे 78 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. आता आगामी काळातही पाकिस्तानच्या शेअर बाजारात आणखी घसरण होऊ शकते अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात बुधवारी केएसईमध्ये 12 हजारांहून अधिक अंकांची ऐतिहासिक वाढ झाली होती. कारण त्यावेळी डोनाल्ड ट्रंप यांनी युद्धविरामाची घोषणा केली होती. कारण या युद्धविरामासाठी पाकिस्तान मध्यस्थ म्हणून भूमिका बजावत होता, त्यामुळेच ही मोठी वाढ झाली. मात्र सोमवारी कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये मोठी घसरण झाली. केएसईमध्ये व्यवहारादरम्यान 7 हजारांहून अधिक अंकांची घसरण झाली आणि निर्देशांक 160,158.92 अंकांपर्यंत खाली आला. शुक्रवारी बाजार बंद झाला त्यावेळी केएसई 167,191.38 अंकांवर होता.

पाकिस्तानी शेअर बाजारात झालेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. 10 एप्रिल रोजी केएसई बंद होताना एकूण मार्केट कॅप 66.58 अब्ज डॉलर होती, जी व्यवहारादरम्यान कमी होऊन 63.78 अब्ज डॉलरवर आली. याचा अर्थ गुंतवणूकदारांना सुमारे 2.8 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानी रुपयांत हे नुकसान 78 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या पाकिस्तानसाठी हे मोठे नुकसान मानले जात आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *