पाकीस्तानी मच्छीमाराला सापडला ७ कोटींचा मासा

कराची, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोणाचे नशिब कधी साथ देईल ते सांगता येत नाही. ‘भगवान देता है, तो छप्पर फाड के देता है’,अशी प्रसिद्ध म्हण आहे. पाकिस्तानातील कराची शहरातील एक मच्छीमाराचे नशिब असेच फळफळले आहे. त्याच्या जाळ्यात तब्बल ७ कोटी रुपयांचा मासा सापडला आहे. या एका माशाने मच्छिमाराला मालामाल केले आहे. अनेक औषधी गुणधर्म असलेल्या दुर्मिळ मासा सापडल्याने तो रातोरात करोडपती झाला आहे. इब्राहिम हैदरी असे संबंधित मच्छीमाराचे नाव आहे.
इब्राहिम हैदरी हा सोमवारी त्याच्या सहकाऱ्यांसह अरबी समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्यांच्या जाळ्यात गोल्ड फिश म्हणजेच सोवा मासा अडकला. दरम्यान, शुक्रवारी सकाळी बंदरात झालेल्या लिलावात इब्राहिम हैदरी यांना सात कोटी मिळाले.
सोवा मासा हा खूप मौल्यवान आणि दुर्मिळ मानाला जातो. कारण, त्याच्या शरिरातून पडणारे पदार्थ अनेक आजारांवर गुणकारक आहेत. माशापासून मिळणाऱ्या धाग्यासारखा पदार्थ शस्त्रक्रियेतही वापरला जातो. माशाचे वजन २० ते ४० किलो पर्यंत असते, ज्याला पूर्व आशियाई देशांमध्ये मोठी मागणी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सोवा सांस्कृतिक आणि पारंपारिक महत्त्व देखील आहे, जे पारंपारिक औषधे आणि स्थानिक पाककृतींमध्ये वापरले जाते.
SL/KA/SL
10 Nov. 2023