भारतात पाकिस्तानी चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि वेब-सिरीज दाखवण्यास बंदी

नवी दिल्ली, दि. ८ : पाकीस्तान विरोधात कठोर पावले उचलत असताना आज भारताने राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने देशात पाकिस्तानी चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि वेब-सिरीज यासारख्या कोणत्याही कन्टेन्टचे प्रदर्शन तात्काळ बंदी घातली आहे. हा आदेश सर्व ओटीटी आणि मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर लागू होईल.
मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की ही बंदी सबस्क्रिप्शन आधारित आणि मोफत सामग्री दोन्हीवर लागू होईल. कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्म, म्युझिक अॅप, पॉडकास्ट सेवा किंवा इतर डिजिटल माध्यमांना हे सुनिश्चित करावे लागेल की पाकिस्तानमध्ये बनवलेला किंवा त्याच्या प्रभावाखाली असलेला कोणताही कंटेंट आता भारतात उपलब्ध नाही.
हा आदेश माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता) नियम, २०२१ अंतर्गत जारी करण्यात आला आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले की पाकिस्तानशी संबंधित कोणताही मजकूर प्रसारित केल्याने देशाच्या सार्वभौमत्वाला, सुरक्षिततेला आणि परदेशांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे, सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म, मीडिया स्ट्रीमिंग सेवा आणि मध्यस्थांना भारतात असा कोणताही कंटेंट दाखवणे थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.