पाकीझा नासिक फॅशन विकने जिंकली नासिककरांची मने

नाशिक, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिकची ओळख फॅशन नगरी म्हणून सर्वदूर पोहोचावी यासाठी गेल्या सहा दिवसांपासून शहराच्या विविध भागांसह ईगतपुरी येथे संपन्न झालेल्या पाकीजा नासिक फॅशन विकचा अंतिम दिमाखदार सोहळा रामलिला बॅक्वेटस् अॅण्ड लाॅन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा सोहळा बघण्यासाठी फॅशनप्रेमी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.
या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणुन अनेक बाॅलीवुड आणी हाॅलीवुड चित्रपटांचे काॅश्चुम डिझायनर संदीप कुमार हे उपस्थित होते. आंतरराष्र्टीय फॅशन शो ला साजेशी रन वे ची निर्मिती करण्यात आली होती. नामवंत काॅश्चुम डिझायनर संदीप कुमार यांचेसह पाकीझा कटपीस सेंटरचे संचालक मोहम्मद हुसैन चिका, अब्बीज् इन्स्टीट्युट आॅफ ब्युटी काॅस्मोटाॅलाॅजीच्या डाॅ. सकीना पंजाबी आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. प्रमुख अतिथींचा परिचय डाॅ. सिध्दार्थ धारणे यांनी करुन दिला. मोहम्मद हुसेन चिका यांचे हस्ते संदीप कुमार यांचा सत्कार करण्यात आला.
नाशिकमध्ये फॅशनविकची पायाभरणी करण्यासाठी अग्रेसर असलेल्या चिका यांचा सत्कार संदीप कुमार यांचे हस्ते करण्यात आला. फॅशन विक साठी महत्वपुर्ण योगदान देणारे हाॅटेल स्वराजचे संचालक मंगेश जाधव, ईगतपुरी येथील टचवुड ब्लीस नेचर रीट्रीट रिसाॅर्टचे रुपाली सुराणा आणि कपिल सुराणा, ३६० डिग्री आॅब्जेक्ट दि आर्ट गॅलरीचे धरम पटेल , सागर पटेल, अब्बीज् इन्स्टीट्युट आॅफ ब्युटी काॅस्मोटाॅलाॅजीच्या डाॅ. सकीना पंजाबी, युनिकाॅल अॅडेसिव्हचे गिरीश चुघ, हेमल चुघ, मिरर सलुन अॅण्ड अॅकॅडमीच्या नेहा खरे, सोनी गिफ्टस् चे नितिन मुलतानी, शाॅपर्स स्टाॅपचे व्यवस्थापक विशाल
आदींचा सत्कार प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आला.
युवती माॅडेल्सचा राऊंड, बच्चे कंपनीचा राऊंड, जेन्टस् माॅडेल्सचा राऊंड, शाॅपर्स स्टाॅप राऊंड व भारतातील विविध राज्यातील वेशभुषांचा राऊंड असे पाच राऊंड घेण्यात आले. फॅशन प्रेमींनी जल्लोष करीत माॅडेल्सचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन आणि सूत्रसंचलन डाॅ. सिध्दार्थ धारणे यांनी केले. आर.एस. वाड्रोबच्या संचालक फॅशन डिझायनर रुपाली पगारे यांनी ड्रेस डिझाईन आणी स्टीच केले. तर दिग्दर्शन श्रीराज जाधव यांनी केले.
या संपूर्ण फॅशन विक मध्ये रॅम्प वाॅक करणारे माॅडेल्स तसेच पाठीमागे परिश्रम घेणारे व्यक्तींचा संयोजकांच्या वतीने प्रशस्ती पत्रक, सन्मान चिन्ह आणि भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला. शिवभक्त असलेल्या संदीपकुमार यांनी त्र्यंबकेश्वरला येऊन भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. डाॅ. सिध्दार्थ धारणे यांनी त्र्यंबकेश्वर धार्मिक महत्व सांगितले.
ML/ML/SL
18 March 2024