दादरमध्ये ‘पैठणी स्टुडिओ’, मिळतात पैठणीच्या 80 वस्तू

 दादरमध्ये ‘पैठणी स्टुडिओ’, मिळतात पैठणीच्या 80 वस्तू

मुंबई, दि. १० : दादर हिंदमाता परिसरात असलेला नाविन्यास हा एक खास पैठणी स्टुडिओ असून येथे पारंपरिक पैठणीपासून तयार केलेल्या सुमारे 70 ते 80 प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत. हा स्टुडिओ केवळ साड्यांपुरता मर्यादित न राहता महिलांसाठी इंडो-वेस्टर्न, एथनिक वेअर, पुरुषांसाठी मोदी जैकेट्स, पैठणी टोप्या, ब्रोचेस, तसेच मुलांसाठी किड्स वेअर आणि संपूर्ण कुटुंबासाठी कॉम्बो कलेक्शन देखील उपलब्ध करून देत आहे. इथे महिलांसाठी एक खास योजना म्हणजे पैठणी बिशी.

स्टुडिओमध्ये गणपतीसाठी पैठणी बॅकड्रॉप्स, पर्सेस, क्लचेस यांसारख्या अ‍ॅक्सेसरीज देखील उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, नाविन्यास भारतासह जगभरात डिलिव्हरीची सुविधा देतो आणि क्युरिअर शुल्कही खूपच माफक ठेवले आहे.

नाच ग घुमा पॅटर्नमध्ये तयार केलेले इंडो-वेस्टर्न जॅकेट्स, 1050 रुपयांपासून पैठणी दुपट्टे, 2850 रुपये किंमतीची मोदी जैकेट्स, 300 रुपये दरात पैठणी पासून तयार केलेल्या टोप्या आणि ब्रोचेस, पैठणी ट्रे छोटा 1050, मोठा 1250, मोबाईल स्लिंग 550, आणि नथ लावलेली पॉकेट 750 रुपयांमध्ये येथे मिळते. हे सर्व पर्याय खास गिफ्टिंगसाठी उपयुक्त आहेत.

SL/ML/SL

paithani-studio-in-dadar-80-paithani-items-available

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *