महाराष्ट्राची पैठणी व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये प्रदर्शित होणार

 महाराष्ट्राची पैठणी व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये प्रदर्शित होणार

मुंबई, दि. १२ — महाराष्ट्रातील पारंपारिक वस्त्र व जी सुंदर वीणकामाचा एक अविष्कार आहे तसेच ज्याला साडयांची महाराणी म्हणून ओळखले जाते अशी महाराष्ट्राची पैठणी आता लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये प्रदर्शित होणार आहे. सांस्कृतीक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी केलेली विनंती संग्रहालयाने मान्य केली आहे.

शूर मराठा सरदार रघुजीराजे भोसले यांची ऐतिसाहिक तलवार ताब्यात घेण्यासाठी राज्याचे सांस्कृती कार्य मंत्री ॲड आशिष शेलार हे सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी लंडनच्या प्राचीन व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयाला भेट दिली. यावेळी संग्रहालयाचे संचालक मिस्टर हंट आणि त्यांचे कन्झर्वेटर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काही महत्त्वाच्या चर्चा झाल्या व त्यातून सकारात्मक निर्णय झाले.

ॲड आशिष शेलार यांनी सांगितले की, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक असलेली वाघनखं आपल्याला जरूर तीन वर्षासाठी लोन वर मिळालेली आहेत. पण ती परत करावी लागतील अशा पद्धतीच्या गोष्टी यापुढे होता कामा नयेत म्हणून अशा ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी विक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये आहेत, त्या यापुढे जास्त काळासाठी लोनवर मिळण्याबाबत सकारात्मक चर्चा आम्हा दोघांमध्ये झाली.

मुंबईत बीकेसी येथे महाराष्ट्र सरकार जे राज्य संग्रहालय उभारणार आहे त्यासाठी सल्लागार तज्ञ म्हणून व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम आपल्याला सहकार्य करेल. या सहकार्याचा करार व्हावा या दृष्टीने सांस्कृतिक विभाग काम करीत आहे. व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये आपली महाराष्ट्रातील पैठणी ही प्रदर्शित केली जावी ही मागणी आम्ही केली ती त्यांनी मान्य केली आणि या पुढच्या काळामध्ये आपल्या पैठणी सोबतच हातमागावरची वस्त्रांचे प्रदर्शनही या संग्रहालयामध्ये होईल या दृष्टीने सकरात्मक बोलणी झाली, असे ॲड शेलार यंनी सांगितले.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *