पैठणच्या शेतकऱ्याने KBC मध्ये 50 जिंकले लाख

मुंबई, दि. १ : संपूर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्र अतिवृष्टीने ग्रस्त असताना एका शेतकऱ्याला सुखद यशाने दिलासा मिळाला आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमात भल्याभल्यांना न जमणारी गोष्ट या पठ्ठ्याने करुन दाखवली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील शेतकरी कैलास रामभाऊ कुंटेवाड (Kailas Kuntewad) यांनी एकही लाईफलाईन न वापरता, तब्बल 50 लाख रुपये जिंकले आहेत. कौन बनेगा करोडपतीच्या सोमवारी प्रदर्शित झालेल्या भागात कैलास कुंटेवाड यांची कमाल दाखवण्यात आली. कैलास यांनी तब्बल 14 प्रश्नांची उत्तर बिनचूक दिली. पुढे 1 कोटी रुपयांसाठी त्यांना 15 वा प्रश्न विचारण्यात आला
कैलास कुंटेवाड यांनी पहिल्या प्रश्नापासूनच धडाकेबाज सुरुवात केली. कैलास यांनी 10 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली. त्यानंतर त्यांनी साडेसात लाखांच्या 11 व्या प्रश्नांचंही उत्तर त्यांनी बरोबर दिलं. मग 12 व्या प्रश्नावेळी त्यांना ऑडियन्स पोल घ्यावा लागला, त्यांनी उपस्थित प्रेक्षकांची मदत घेऊन उत्तर बरोबर दिलं. एक लाईफलाईन संपली असताना, पुढची उत्तरं बरोबर दिल्याने त्यांची ती लाईफलाईनही जिवंत झाली.
अमिताभ बच्चन यांनी कैलास यांना एक कोटी रुपयांसाठी 15 वा प्रश्न विचारला. त्यासाठी कैलास यांनी संकेत सूचक लाईफलाईन वापरली. त्यातून हिंट मिळाल्यानंतरही कैलास त्या उत्तराबाबत साशंक होते. त्यामुळे त्यांनी 50-50 लाईफलाईन वापरली. दोन ऑप्शन गायब झाल्यानंतरही कैलास त्यांच्या उत्तराबाबत ठाम नव्हते. शेवटी 50 लाखांच्या रकमेसह कैलास यांनी गेम क्विट करण्याचा निर्णय घेतला.
SL/ML/SL
1 Oct. 2025