गिरगाव चौपाटी येथे कुत्रिम तलावात गणेश विसर्जन करण्यासाठी पैशाची मागणी
मुंबई, दि ३ :सहा फुटाखालील गणपतीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. त्याप्रमाणे लोक घरगुती आणि सार्वजनिक सहा फुटाखालील मुर्त्या कृत्रिम तलावत विसर्जन करत आहेत. परंतु महानगरपालिकेच्या कृत्रिम तलावामध्ये गणपतीचे विसर्जनासाठी भाविकांकडून मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी केली जात आहे. याबाबतच्या तक्रारी दिड दिवसांच गणपती विसर्जनापासून यायला सुरुवात झाली आहे. परंतु गौरी गणपती विसर्जना दिवशी मंगळवारी गिरगाव चौपाटीवर या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव गिरगाव चौपाटीवर काही नागरिकांना आला आहे.
गिरगाव चौपाटीवर सहा फुटाखालील गणपतीच्या विसर्जना करता कृत्रिम तलाव उभारण्यात आली आहेत . या तलावात विसर्जना करता येणाऱ्या घरगुती आणि सार्वजनिक सहा फुटाकडील गणपती करता महानगरपालिकेने तैनात केलेल्या जीव रक्षकांकडून गणेश भाविकांकडे विसर्जन करता पैशांची मागणी केली जात आहे. व्यक्ती जर धानदंगडा असेल आणि त्याच्याकडे गळ्यात सोने नाणे असतील तर त्याचा हावभाव पाहून त्यांच्याकडून अवाच्या सवा पैशाची मागणी केली जात असल्यामुळे नागरिकांकडून दीड दिवसाच्या गणपती नंतर याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. परंतु पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांच्या समोरच पैशाचे डिमांड केले जात असल्यामुळे गणेश भाविक मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत. पैसे मागताना आणि घेतानाच्या काही फोटो व्हिडिओ हाती लागल्यामुळे हा भ्रष्टाचार उघड झाला आहे.
याबाबत महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
महानगरपालिका डी विभागातर्फे दरवर्षी गणेशोत्सवाची जोरदार तयारी केली जाते. गणपतीच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर मोठी व्यवस्था उभारण्याचे काम हाताळले जाते. मंत्री महोदय, मुंबई पोलीस, महानगरपालिका बेस्ट प्रशासन आणि परदेशातून येणाऱ्या पाहुणे मंडळींसाठी वेगवेगळे भव्य दिव्य स्टेज बांधून तंबू उभारला जातात. मोबाईल टॉयलेट, लोखंडी पत्रे, जीव रक्षक, बोटी आणि तारफ्यांवर सुद्धा लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु दरवर्षी याच गोष्टींवर करोडो रुपये खर्च करून सुद्धा नागरिकांना योग्य सुविधा मिळत नसल्यामुळे पालिका अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या युतीवर संशय व्यक्त जात आहे. यावर्षी चौपाटीवरच्या व्यवस्थेसाठी करोड रुपयांची निविदा काढून सुद्धा लोकांना सुविधा अपुऱ्या पडत असल्याने एका समाजसेवकांनी सोशल मीडियावर टेंडर घोटाळ्याचा एक व्हिडिओ सुद्धा अपलोड केला आहे .KK/ML/MS