पगडी एकता संघाच्या वतीने आझाद मैदानात झाले आंदोलन

 पगडी एकता संघाच्या वतीने आझाद मैदानात झाले आंदोलन

मुंबई, दि. १८
म्हाडा इमारत दुरुस्तीव पुनर्रचना मंडळाने उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी सक्षम प्राधिकरण नसल्याचे जाहीर केले, मात्र त्यानंतर याबाबत कोणतेही पुढाकार घेण्याचे निर्देश संबंधित प्राधिकरणांना देण्यात आले नाहीत. त्यामुळे १३ हजार ८०० इमारतींच्या पुनर्विकासाला खीळ बसली असून, याविरोधात आज पगडी एकता संघाच्या वतीने आझाद मैदानात उस्फुर्तपणे निदर्शने करण्यात आली. या निदर्शनामध्ये मोठ्या संख्येने दक्षिण मुंबईतील पगडी इमारती आणि चाळीमध्ये राहणारे नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या माध्यमातून उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी अतिधोकादायक इमारतींना ७८ अ आणि ७८ ब नोटीस देण्यास सुरुवात केली, मात्र नोटीस
देण्यासाठी म्हाडा दुरुस्ती मंडळ सक्षम प्राधिकरण नसल्याने उच्च न्यायालयाने प्रक्रिया स्थगित केली. यामुळे मुंबईतील दक्षिण मुंबईतील जवळपास १३ हजार ८९९ इमारतींच्या पुनर्विकासाची प्रक्रिया थंडावली आहे.

जुन्या आणि ढासळणाऱ्या घरांच्या छायेत राहणाऱ्या रहिवाशांनी मात्र आणखी किती दिवस असे राहायचे? असा सवाल विचारला आहे. धोकादायक इमारतींना पुनर्विकासाची गरज असून नियमावली काळानुरूप बदलनू निश्चित धोरण ठरवण्याची अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली आहे. मात्र, प्रकरण स्थगित राहिले तर याबाबत चर्चा किंवा नवे बदल होणार नाहीत आणि पुनर्विकास रखडतील अशी माहिती पगडी एकता संघाचे अध्यक्ष मुकेश शाह यांनी दिली.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *