श्रीलंकेतून आल्या श्रीराम आणि सीता यांच्या पादुका

 श्रीलंकेतून आल्या श्रीराम आणि सीता यांच्या पादुका

नागपूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अशोक वाटिका श्रीलंका येथून श्रीराम आणि माता सीता यांच्या पादुका घेऊन येणारी यात्रा काल सांयकाळच्या सुमारास नागपुरात दाखल झाल्यानंतर नागपुरातील ऐतिहासिक असलेल्या पोद्दरेश्वर राम मंदिरात पोहचल्यानंतर तिचे स्वागत करून पादुकांचे पूजन करण्यात आले.

ही यात्रा भगवान श्रीराम ज्या ज्या ठिकाणी गेले होते त्या त्या ठिकाणी जात असून ती अयोध्येला येथे पोहचणार आहे. या पादुका काल सांयकाळी नागपुरात आल्या नंतर आरती आणि पूजन केल्यानंतर नागरिकांना दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या होत्या. माजी महापौर दयाशंकर तिवारी, राजे मुधोजी भोसले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या पादुकांचे दर्शन घेतले. राम राज्य युवा यात्रा असे या यात्रेचे नाव असून ही यात्रा श्रीलंकेतून निघाली असून ती अयोध्येकडे जात आहे.Padukas of Sri Rama and Sita came from Sri Lanka

ML/KA/PGB
1 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *