पाचखेड येथे आढळले 3 हजार पूर्वीच्या घरांचे आणि विहिरींचे अवशेष

 पाचखेड येथे आढळले 3 हजार पूर्वीच्या घरांचे आणि विहिरींचे अवशेष

यवतमा, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील पाचखेड या छोट्याशा गावात तब्बल 3000 वर्षांपूर्वीच्या घरांचे तथा विहिरींचे अवशेष सापडले आहेत. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाच्या वतीने पाचखेड येथे उत्खनन सुरू आहे.
यामध्ये तत्कालीन घरांचे तसेच सहा विहिरींचे अवशेष सापडले आहेत .या उत्खननामध्ये आढळलेली घरे ही गोलाकार आणि कुडा मातीची असल्याचे दिसून येत आहे. याबाबत पुरातत्व विभाग अधिकृत माहिती देतील तेव्हा नक्कीच सत्यता बाहेर येईल. साहजिकच लोकांमध्ये कुतुहल निर्माण झाले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *