मुंबईत 4 सार्वजनिक शौचालयामागे स्त्रियांसाठी केवळ 1 शौचालय

 मुंबईत 4 सार्वजनिक शौचालयामागे स्त्रियांसाठी केवळ 1 शौचालय

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईत 4 सार्वजनिक शौचालयामागे स्त्रियांसाठी केवळ 1 शौचालय असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
ही लिंगनिहाय तफावत अग्रक्रमाने दूर करणे गरजेचे असून स्त्रियांसाठीदेखील पुरेशी शौचालय संख्या असायला हवी, असे मत प्रजा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
प्रजा फाऊंडेशन तर्फे मुंबईतील नागरी समस्यांची सद्यस्थिती, 2024′ हा अहवाल आज प्रेस क्लब येथे प्रकाशित करण्यात आला.
यात मुंबईतील स्वच्छता आणि वायू प्रदूषण समस्यांचा उहापोह करण्यात आला आहे. आरोग्य अधिकार आणि जगण्याचा अधिकार हे नागरिकांचे मूलभूत अधिकार आहेत. या अधिकारांच्या आड येणाऱ्या समस्या, विशेषतः सार्वजनिक शौचालये, सामुदायिक स्वच्छता संकुले आणि जल व वायू प्रदूषण पातळी यांच्याशी निगडित नागरी सुविधांच्या सद्यस्थितीचे विश्लेषण करणे हा सदर अहवालाचा हेतू आहे.असे मिलिंद म्हस्के यांनी
सांगितले.
मायानगरी म्हणून ओळखल्या जाणारा मुंबईत देशभरातून अनेकजण येत असतात. इथे कमाई करून आपले, आपल्या कुटुंबाचे आयुष्य सुधारावे हीच त्यांची अपेक्षा असते. आज शहराची लोकसंख्या 1.92 कोटी असून शिक्षण व रोजगार, नोकरी यानिमित्ताने दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या 80 लाखाहून अधिक आहे. जर शहरातील वातावरण स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण असेल तरच हे नागरिक अर्थकारणात प्रभावीपणे आणि भरीव योगदान देऊ शकतील, हे स्पष्ट आहे.

सार्वजनिक शौचायले आणि सामुदायिक स्वच्छता संकुले कशी व किती असावीत याचे स्पष्ट मापदंड स्वच्छ भारत अभियानात दिलेले आहेत. शहरातील स्वच्छता व आरोग्य स्थितीची तपासणी वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणातून घेतली जाते. 2023 मधील सर्वेक्षणानुसार मुंबई शहर ODF + आहे, म्हणजे उघड्यावरील शौचास जाणे रोखले आहे आणि सार्वजनिक शौचालय सुविधांनी स्वच्छतेच्या बाबतील 90% गुण संपादित केले आहेत. पण महाराष्ट्रातील आणि देशातील दहा लाख पेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांच्या तुलनेत मुंबईची श्रेणी बरीच खालची आहे. महाराष्ट्रातील शहरांमध्ये मुंबईचे श्रेणी 37 तर देशातील शहरांमध्ये मुंबईची श्रेणी अधिक घसरून 189 झाली आहे. एक जागतिक महानगर आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची ही व्यापारी व सांस्कृतिक कारणांमुळे ये-जा करणाऱ्या रहिवाशांचे प्रमाण अधिक आहे तिथली स्थिती तर अधिक बिकट आहे. सी वॉर्ड (मरीन लाईन्स, चिरा बाजार, गिरगाव) मध्ये हे प्रमाण फारच व्यस्त असून पुरुषांच्या 6 सार्वजनिक शौचालयांमागे स्त्रियांसाठी केवळ 1 शौचालय उपलब्ध आहे. ही लिंगनिहाय तफावत अग्रक्रमाने दूर करणे गरजेचे असून स्त्रियांसाठीदेखील पुरेशी शौचालय संख्या असायला हवी.
असे मस्के म्हणाले.

Out of 4 public toilets in Mumbai, only 1 toilet for women

ML/ML/PGB
28 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *