आपला ग्रह-आपले गृह

 आपला ग्रह-आपले गृह

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आज २२ एप्रिल २०२१! गेली ५० वर्षे आपण हा दिवस ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून साजरा करत आहोत. आजचा ५१ वा! (51 st World Earth Day) ‘पृथ्वीचे पुनर्संचयन-पुनर्स्थापन’ (Theme of 2021 : Restore the Earth!) ही आहे यंदाची संकल्पना! आपली पृथ्वी अंदाजे ४.५ अब्ज वर्षांची आहे. पण तिच्यासाठी तिचा दिन साजरा करण्याची
सुरुवात मात्र १९७० साली झाली. अमेरिकेचे तत्कालीन सिनेटसदस्य आणि पर्यावरणतज्ज्ञ गेलॉर्ड अँटन नेल्सन (Gaylord Anton Nelson) यांनी हवा, पाणी आणि जमिनीत होणारे प्रदूषण लक्षात घेऊन २२ एप्रिल १९७० रोजी पहिला जागतिक वसुंधरा दिन साजरा केला आणि तेंव्हापासून दरवर्षी हा दिन जगभर साजरा केला जातो.

जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्याची निकड (Need to celebrate World Earth Day) हा दिन साजरा करण्याची निकड आत्ताच का बरे भासू लागली ? तर, आपली सध्याची जीवनशैली हे उत्तर नाईलाजाने द्यावे लागते. औद्योगिक क्रांतीपूर्वीची पृथ्वी आणि नंतरची पृथ्वी (Earth – Pre and Post Industrial Revolution)असा विचार केला तर आपण पृथ्वीशी किती क्रूरतेने वागतो आहोत हे समजेल. औद्योगिक क्रांतीनंतर संपूर्ण जगाच्या जगण्याच्या, विकासाच्या संकल्पना बदलल्या (Concepts of development changed)आणि त्या चुकीच्या आहेत हे आपल्या लक्षात येईपर्यंत पृथ्वी या आपल्या एकमेव घराचे आपण अतोनात नुकसान करून झालेले होते. माणूस जोपर्यंत निसर्गानुकूल जीवनशैली अंगीकारत होता तोपर्यंत पृथ्वीवरचे सर्व सजीव सुखेनैव जगत होते. जीवनचक्र सुरळीत चालू होते. परंतु औद्योगिक क्रांती, विज्ञान-तंत्रज्ञान प्रगतीची घोडदौड सुरु झाली आणि तेव्हापासून जीवाष्म इंधन वापर (Excessive use of fossil fuel)वाढला. प्लास्टिकचा शोध लागला आणि त्याचा वापर(Use of Plastic) वाढला. विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या कुशीत राहून विकास साधण्याऐवजी अपरिमित जंगलतोड, कधी अचानक लागलेले / लावलेले(?) वणवे, वाहनांच्या बेसुमार वापरातून

होणारे कर्बवायू उत्सर्जन(CO2 emission) इत्यादींमुळे होणारे वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, जलप्रदूषण आणि तापमानवाढ(air, soil, water pollution and Global warming) त्यामुळे समुद्राच्या पातळीत होणारी वाढ (Sea level rise) यांनी अगदी टोक गाठले. पृथ्वीजवळ प्रत्येक सजीवाला जगवण्याची क्षमता आहे, पण माणसाच्या लोभी वृत्तीला तिच्याजवळ उत्तर नाही. आपण तिची किती हेळसांड करत आहोत याची आपल्याला कल्पना तरी आहे का? आपण तिच्याकडून फक्त ओरबाडून घेत आलो आहोत, पण तिला काही दिलेही पाहिजे असा विचार आपण कितीवेळा करतो? म्हणूनच सध्याची परिस्थिती अशी आहे की रोजच हा दिन आहे असे मनाशी ठरवून तशा कृती करत राहणे गरजेचे झाले आहे. यंदाच्या संकल्पनेनुसार आपण कायकाय करू शकतो? What we can do to this year’s theme of World Earth Day? अगदी स्वतःपुरत्या काही गोष्टी करायचे ठरवले तरी पृथ्वी पुनर्स्थापित (Restore the Earth) होण्यास हातभार लागेल आणि खूप चांगले परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतील.

१.वायूप्रदूषण व ध्वनिप्रदूषण घटवणे (Decrease Air and Noise pollution)


कोविडसाथरोगामुळे लॉकडाउनमध्ये रस्त्यावरील वाहने बंद होती तेव्हा वायूप्रदूषणाचे प्रमाण घटलेले पाहिले. स्वच्छ मोकळा श्वास घेता येऊ लागला. वाहनांच्या कर्कश्श भोंग्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण थांबल्याने होणाऱ्या शारीरिक – मानसिक आजारांचे प्रमाण कमी झाले. घराभोवतीच्या झाडांवर वेगवेगळ्या पक्ष्यांची किलबिल ऐकता येऊ लागली. मन प्रसन्न राहायला आणखी काय हवे असते? विनाकारण वाहने चालवून कर्बवायू उत्सर्जनात वाढ करण्यापेक्षा ते कमी होण्यासाठी फक्त दूरच्या अंतरासाठी वाहनांचा वापर आपण करू शकतो. सार्वजनिक वाहतूकव्यवस्था मजबूत(Strong Public Transport System) केली तर असंख्य वाहने रस्त्यावर येणे थांबेल. त्यासाठी नगरसेवकांनी प्रशासनाच्या सहकार्याने Co-operation between Local representatives and administration to reduce all type of pollution) काम करावे यासाठी त्यांच्यावर एक सूज्ञ नागरिक म्हणून आपण दबाव टाकू शकतो.

२. जलप्रदूषण रोखणे आणि जलपुनर्भरण करणे ( decrease water pollution and Rainwater harvesting )


आपल्या पृथ्वीवर ९७.५% खारे पाणी (97.5% salt water on Earth and 2.5% fresh water)आहे आणि केवळ २.५% पाणी गोडे असून त्यातले फक्त ०.३% पाणी जमिनीवर पिण्यासाठी (0.3% water available for drinking) उपलब्ध आहे. असे असताना केवळ आपल्या घरात नळाला पाणी येते म्हणून ते आपण कसेही वापरायचे, ही उधळपट्टी येत्या काही वर्षांतच आपल्याला महाग पडणार आहे, याची कल्पना आपल्याला असायला हवी. आज जगात बहुतांश ठिकाणी पाणीटंचाई (water scarcity)जाणवू लागली आहे. आपण पाणी मिळावे म्हणून जागोजागी कूपनलिका(Bore wells) खोदून पाणी मिळवायला सुरुवात केली. सुरुवातीला ५० फूट खोलीवर मिळणारे पाणी पुढे ५००-८०० फूट खोल खणूनही मिळेनासे झाले! आपण पृथ्वीकडून फक्त हवे ते ओरबाडत राहिलो. ती आपल्याला इतके काही देत असते, आपण किमान शहाणपणाने
निसर्गातलेच तिला काही द्यायचा विचार करायला हवा. पाणी काटकसरीने वापरणे आवश्यक आहेच पण पर्जन्यजलसंधारण (Rainwater harvesting) करून ते पाणी कूपनलिकांमध्ये सोडून चाळणी झालेल्या जमिनीची पाण्याची पातळी (Raise water level by doing Rainwater harvesting)वाढवता येते, जमिनीतले मृत झरे जिवंत होण्यास मदत होते आणि निदान
आपल्या भागातली पाणीटंचाई आपण घालवू शकतो. आपल्या महाराष्ट्रातच बीड जिल्ह्यातल्या कामखेडा(Maharashtra, Beed, Kamkheda village, Rainwater harvesting by Climate Reality Project- Expert Col.(Retd.) Shashikant Dalvi) गावाने क्लायमेट रियालिटी प्रोजेक्टमधील पर्जन्यजलसंधारणतज्ज्ञ कर्नल (निवृत्त) शशिकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली
पर्जन्यजलसंधारणाची कामे करून आपल्या गावाला पाणीटंचाईतून (Free from water scarcity) मुक्त केले. शहरांमध्येही आपल्या सोसायट्यांच्या गच्चीवर पर्जन्यजलसंधारण प्रकल्प सुरु करून आपण बरेच काही साध्य करू शकतो. टँकर मागवणे बंद झाल्याने त्याद्वारे होणारे कर्बवायू उत्सर्जनही थांबते आणि पाणी विकत घेण्यावर होणारा खर्च वाचतो. पर्जन्यजलसंधारणासाठी येणारा खर्च सुरुवातीच्या काही वर्षांतच भरून निघतो आणि पुढे हे पाणी सगळ्यांना अगदी मोफत मिळायला लागते. तसेच आपल्यापुरते प्रत्येकाने रासायनिक द्रव्ये आणि डिटर्जंट कमीतकमी (minimum use of chemicals and detergents) वापरण्याचे ठरवले तरी पाण्याचे आरोग्य(Health of water) आणि पर्यायाने मातीचे आरोग्य (Retain Health of soil) जपायला मदतच होईल.

३. भूमिप्रदूषण रोखणे आणि भूमीचा कस वाढवणे(Prevent Pollution of soil and increase soil fertility)


शेती-बागांमध्ये भरमसाठ उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करणे थांबवून सर्वांनीच आपल्या घरातील / परिसरातील ओल्या कचऱ्याचा वापर करून सेंद्रिय खत वापरणे सुरु केले तर जमिनीचे प्रदूषण थांबेलच शिवाय मातीचा कस वाढेल आणि मनुष्याला उत्तम प्रतीचे धान्य – भाज्या मिळाल्याने रासायनिक खतांमुळे होणारे आजारही नियंत्रणात राहतील.

पावसामुळे हेच रासायनिक पदार्थ वाहून जलस्रोतांमध्ये मिसळतात त्यामुळे पाणी प्रदूषित होते. प्लास्टिकअतिवापरामुळेही जमीन व पाणी प्रदूषित होते. चाऱ्याअभावी गायी म्हशींना प्लास्टिक खाताना बघून मानव किती असंवेदनशील झाला आहे हे दिसते. जाणीवपूर्वक आपण प्लास्टिकवापर कमी केला पाहिजे आणि वापरावे लागणारे प्लास्टिक पुनर्निर्मितीकेंद्रात जाईल
हे कटाक्षाने पहिले पाहिजे. या सगळ्यातूनच निसर्गाविषयीची तुमची संवेदनशीलता (Sensitivity for nature and Earth)
पृथ्वीला जाणवणार आहे आणि ती पुनर्स्थापित होण्यास मदतच होणार आहे. आजच्या वसुन्धरादिनाच्या निमित्ताने इतकेच मागणे. (Restore the Earth)

राधिका कुलकर्णी

मुक्त पत्रकार व क्लायमेट रियालिटी लीडर – मेंटॉर

k_radhika@hotmail.com

ML/KA/PGB
22 Apr 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *