आपली बंद दाराआड झालेली चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसबाबत नाही…
कोल्हापूर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आपण बंद खोलीत चर्चा केली, ती राष्ट्रवादी पक्षाबाबत नव्हे तर एका प्रकल्पाबाबत केली असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केले. नवीन सहकार मंत्र्यांना आपल्याशी दोन-तीन विषयावर बोलायचे होते, त्यामुळेच त्या कार्यक्रमात खुर्चीची अदलाबदल केली असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोल्हापुरात झालेल्या पत्रकार बैठकीत पवार यांनी सांगितले की, पुण्यात गुरुवारी झालेल्या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपली बंद खोलीत चर्चा झाली. या चर्चेत साखर कारखान्याच्या प्रश्नावर बरंच बोलणं झालं. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यातही याबाबतच बोलणं झालं. राष्ट्रवादी पक्षाच्या राजकारणाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही असे ते म्हणाले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भेट घेतली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची त्यांची इच्छा आहे. पण याबाबत त्यांची टोकाची भूमिका नव्हती. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे रोज शिवसेनेचे अथवा राष्ट्रवादीचे हे नेते संपर्कात आहेत, ते नेते संपर्कात आहेत असे सांगत आहेत याबाबत विचारले असता पवार म्हणाले, मी पण वाट बघतोय, कोण कोण जाणार आहे ते?
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपचा पाठिंबा काढून घेतील असे वाटत नाही, ते डोक्यातून काढून टाका असे सांगताना पवार म्हणाले, उद्योग मंत्री सामंत हे दावोसला गुंतवणूक करण्यासाठी गेले होते की पक्ष फोडायला असा प्रश्न पडतो .
ML/ML/SL
24 Jan. 2025