आमचा अजेंडा सर्वसामान्यांना दिलासा देणारा

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मी स्वतःला cm म्हणजे कॉमन मॅन समजतो , त्यामुळे आमचा अजेंडा सर्व सामान्यांना लाभ मिळवून देण्याचा आहे असं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितलं, ते विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या राज्यातील कायदा सुव्यवस्था, उद्योग उभारणी , परदेशी गुंतवणुक, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी अनेक विषयांवरील चर्चेला उत्तर देत होते. हे राज्य उद्योग स्नेही आहे म्हणूनच राज्यात एक लाख कोटींपेक्षा अधिक परदेशी गुंतवणुक झाली आहे असं ते म्हणाले.
धारावी कराना हक्काचे घर मिळवून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे, रेस्कोर्स वर केवळ सेंट्रल पार्क उभारण्यात येईल तिथे कोणतेही बांधकाम होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. मराठा आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर तपासून दिलेलं आहे, त्यामुळे टिकेलच याची खात्री आहे, येत्या पोलीस आणि शिक्षक भरती मध्ये ते लागू करूनच भरती केली जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई गोवा हा मुंबई पुणे सारखा मर्यादित प्रवेश असणारा नवा ग्रीन फील्ड महामार्ग उभारण्यात येत आहे, मुंबईत सध्या सुरू असलेली डीप क्लीन मोहीम राज्यभर राबवून स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रण करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यानी सांगितलं. राज्यात शासन आपल्या दारी अभियानातून आजवर दोन कोटी बहात्तर लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. ग्रीन हायड्रोजन ला प्राधान्य देणारे आपले पाहिले राज्य आहे असंही मुख्यमंत्र्यानी यावेळी सांगितलं.
ML/KA/SL
1 March 2024