धर्मा प्रॉडक्शनमध्ये सिरम इन्स्टीट्युटच्या अदर पूनावालांची ५० टक्के भागीदारी
बातमी अपडेट होत आहे…..
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अब्जाधीश सीईओ आदर पूनावाला यांनी धर्मा प्रोडक्शन्समध्ये ५० टक्के शेअर विकत घेतले आहेत. तब्बल १ हजार कोटींमध्ये हा सौदा झाला आहे. धर्मा प्रॉडक्शन्सने आज ही माहिती दिली. धर्मा प्रोडक्शन्सची या संदर्भात आधी सारेगामा व रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत बोलणी सुरू होती. मात्र, शेवटी सीरमनं बाजी मारली. त्यानुसार आता धर्मा प्रोडक्शन्समध्ये सेरेन एन्टरटेनमेंटचा ५० टक्के हिस्सा असेल. तर, धर्मा प्रोडक्शन्सकडं ५० टक्के हिस्सा असेल. अपूर्व मेहता हेच कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहणार आहेत.
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :