विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन

 विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रख्यात दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते दिवंगत विनय आपटे यांच्या १० व्या स्मृतिदिना निमित्त विनय आपटे प्रतिष्ठान तर्फे लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी लघुचित्रपट पाठवण्याची अंतिम मुदत २५ नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली असून यावर्षी लघुचित्रपटला कोणत्याही विषयाचे बंधन नसल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यामुळे स्पर्धकांना मुक्त विषयावर लघुचित्रपट पाठवता येतील. मात्र या लघुचित्रपटाला नियमानुसार जास्तीत जास्त २० मिनिटांची कालमर्यादा आहे. त्यासाठी २५ वर्षांआतील आणि २५ वर्षावरील असे दोन वयोगट ठेवण्यात आले आहेत. तसेच या शॉर्ट फिल्म्स मराठी, हिन्दी आणि इंग्रजी या तीन भाषेत पाठवता येतील. ह्या स्पर्धेत सादर होणारे सर्व लघुचित्रपट हे प्लानेट मराठी या ओटीटी चॅनेल वर दाखवण्यात येतील.

प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकच प्रवेशिका पाठवता येईल. दोन्ही गटातील सर्वोत्कृष्ट विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका vinayaptepratishthan@gmail.com ह्या संकेत स्थळावर दि २५ नोव्हेंबर पर्यंत पाठवाव्या. स्पर्धेचे प्रवेश मूल्य रु ५०० असून स्पर्धेतील दोन्ही गटात प्रत्येकी प्रथम क्रमांकाच्या लघुचित्रपटला रु १५,०००/- तर द्वितीय क्रमांकाला १०,००० आणि तृतीय क्रमांकाला रु ७,५०० /- अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक पुरुसोत्तम बेर्डे, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, दिग्दर्शक आणि ज्येष्ठ संकलक राजन वाघधरे, जाहिरात तज्ज्ञ भरत दाभोळकर , ज्येष्ठ चित्रपट संकलक भक्ती मायाळू आणि सुप्रसिद्ध लेखिका आणि गीतकार रोहिणी निनावे उपस्थित राहतील.

SL/ML/SL

7 Nov. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *