पाकिझा ग्लॅमोरामा, नासिक फॅशन वीकचे आयोजन

नाशिक, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पौराणिक आणी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मंत्रनगरी नाशिकची ओळख उद्योग नगरी,द्राक्षपंढरी पासून ते वाईन नगरी पर्यंत पोहोचली आहे. याचबरोबर नाशिक नगरीचे नाव फॅशन नगरी म्हणून सर्वदूर पोहचावे या एकमेव उद्देशाने नाशिक मध्ये प्रथमच फॅशन विकचे आयोजन होत आहे.
फॅशन हा सर्वांचाच आवडीचा विषय आहे. आबालवृध्दां पासून ते अगदी खेड्यापाड्या पर्यंत सर्वांनाच फॅशन करायला आवडते. फॅशन हा तर तरुणाईचा जीव की प्राण आहे. या फॅशन विक मध्ये बालगोपाळही रॅम्प वाॅक करणार आहे. पाकिझा ग्लॅमोरामा नासिक फॅशन वीक २०२४ दि. ६ ते १० मार्च या कालावधीत पाच दिवस रंगारंग सोहळा नाशिक शहरात आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी संपन्न होणार आहे. अंतिम महासंग्राम रविवार दि.१० मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता नाशिक मधील राम लीला बॅन्क्वेट्स आणि लॉन्स येथे आयोजित केला जाईल. अशी माहिती डाॅ. सिध्दार्थ धारणे यांनी दिली.
पाकिझा कट पीस स्टोअरचे सीईओ हुसैन चिका यांनी फॅशन वीक चे प्रायोजकत्व स्विकारले आहे. डाॅ. सिध्दार्थ धारणे तथा रुपाली पगारे यांचे मार्गदर्शनाखाली हा शो संपन्न होत आहे. या दोघांनाही फॅशन क्षेत्रामधील प्रदीर्घ अनुभव आहे. लागोपाठ दोन वर्ष आंतरराष्र्टीय फॅशन विकमध्ये नाशिकला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात दोघांचेही मोलाचे योगदान आहे. डाॅ. सिध्दार्थ धारणे यांच्या आर्ट गॅलरी , डिझाईन स्टुडिओ तर्फे या संपूर्ण सोहळ्याची संकल्पना, नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात आले आहे. श्रीराज जाधव यांनी दिग्दर्शन असुन श्रीराज तसेच रुपाली पगारे यांचे R’s वाड्रोब ड्रेस डिझायनर आहेत. मानसी सिंग या कार्यक्रमाच्या ब्रॅण्ड अॅम्बेसॅडर आहेत.
६ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास त्र्यंबक नाशिक रोडवरील हाॅटेल स्वराज येथे रेड कार्पेट गाला रिसेप्शन सोहळा संपन्न होईल. दि. ७ मार्च रोजी सातपुर एमआयडीसी एरियात ३६० डिग्री आॅब्जेक्ट दि आर्ट गॅलरी येथे फॅशन विकचा अधिकृत उद्घाटन सोहळा होईल.
८ मार्च रोजी जागतिक महिला दिन औचित्य साधुन ईगतपुरी येथील टचवुड ब्लीस नेचर रीट्रीट रिसाॅर्ट येथे महिलांसाठी सायंकाळी फॅशन शो होईल. याकामी रिसाॅर्टचे संचालक रुपाली सुराणा , कपिल सुराणा यांचे मोलाचे सहकार्य आहे. शनिवार दि. ९ मार्च रोजी सायंकाळी त्र्यंबक नाशिक रोड वरील शाॅपर्स स्टाॅप येथे फॅशन शो संपन्न होईल. रविवार १० मार्च रोजी सायं. ६ वाजता नाशिक मधील आडगाव नाक्याजवळ राम लीला बॅन्क्वेट्स , लॉन्स अंतिम सोहळा संपन्न होईल. त्याच बरोबर फुड फेस्टीवलचा देखील आनंद घेता येईल. नाशिक व परिसरातील माॅडेल्सना पुढे जाण्यासाठी संधी मिळावी म्हणून व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जात आहे.
हा शो म्हणजे फॅशन प्रेमींसाठी पाच दिवस मेजवानीच ठरणार आहे. नाशिककरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. विशेष सूचना अशी की, ज्यांना वेब साईट वर कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ बघायचे असतील त्यांनी नाशिक नव्हे तर नासिक फॅशन विक वेबसाईट बघावी.
( www.nasikfashionweek )
ML/KA/SL
1 March 2024