आयुध निर्माण कारखाना स्फोट, कुटुंबियांचे आंदोलन
भंडारा, दि २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर येथील आयुध निर्माण कारखान्यात झालेल्या स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला होता आणि 5 गंभीर जखमी झाले आहेत. यातील मृतकांच्या कुटुंबियांनी विविध मागण्यांसाठी आज कंपनी समोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाच्या स्थळी मृतदेह ठेवून हे आंदोलन करण्यात आले. कंपनीच्या महाव्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करावा, मृतकांना शाहिदाचा दर्जा द्यावा. केंद्र आणि राज्य शासनाने आर्थिक मदत तात्काळ जाहीर करावी तसेच मृतकांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीत समाविष्ट करावे अश्या मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या. शिवसेनेचे आ. नरेंद्र भोंडेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत आपला पाठिंबा दिला.
ML/ML/SL
25 Jan. 2025