swiggy वरून जेवण मागवणे होणार स्वस्त

 swiggy वरून जेवण मागवणे होणार स्वस्त

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Swiggy या लोकप्रिय फूड डिलिव्हरी App वरून जेवण मागवणे आता स्वस्त होणार आहे. स्विग्गी कंपनीने ग्राहकांसाठी एक खास सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केला आहे.स्विग्गीने वन लाईट मेंबरशिप सुरू केली आहे. यामध्ये फ्री डिलिव्हरी आणि बरेच डिस्काउंट ऑफर्स देण्यात येत आहेत. 99 रुपयांचा हा प्लॅन तीन महिन्यांसाठी असणार आहे. नियमित किंवा वारंवार फूड ऑर्डर करणाऱ्या व्यक्तींसाठी हा प्लॅन अगदीच फायद्याचा ठरणार आहे.

स्विग्गी वन लाईट मेंबरशिप घेतलेल्या यूजर्सना 149 रुपयांहून अधिक किंमतीच्या ऑर्डरवर 10 फ्री डिलिव्हरीज मिळतील. तसंच 199 रुपयांहून अधिक किंमतीच्या इंस्टामार्ट ऑर्डरवर 10 फ्री डिलिव्हरीज मिळणार आहेत. यासोबतच, यूजर्सना 20 हजारांहून अधिक रेस्टॉरंटमध्ये 30 टक्क्यांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. या मेंबर्सना 60 रुपयांहून अधिक किंमतीच्या स्विग्गी जिनी डिलिव्हरीवर 10 टक्के सूटही मिळणार आहे.

स्विग्गीने यापूर्वीच आपल्या ग्राहकांसाठी ‘स्विग्गी वन’ ही सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली आहे. याचंच परवडणारं व्हर्जन म्हणजे स्विग्गी वन लाईट आहे. 99 रुपयांच्या सबस्क्रिप्शनमुळे यूजर्सना कमीत कमी 500 ते 600 रुपयांचा फायदा होणार असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

SL/KA/SL

10 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *