फिनफ्लूएन्सर अवधूत साठेंकडून 546 कोटी रु जप्त करण्याचे आदेश
मुंबई, दि. ६ : फायनान्स इफ्लूएन्सर अवधूत साठे यांच्याविरुद्ध SEBIने अंतरिम आदेश जारी केला आहे. साठे आणि त्यांच्या अॅकॅडमीने कथितरित्या 546 कोटी रुपयांहून अधिक अवैध नफा मिळवल्याचा आरोप आहे आणि सेबीने ही रक्कम त्यांच्याकडून जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत. सेबीने (SEBI) अवधूत साठे यांना पुढील आदेशापर्यंत सिक्युरिटीज मार्केटमध्ये व्यवहार करण्यापासून प्रतिबंधित केले आहे. साठे यांना स्वतःच्या किंवा त्यांच्या कोर्समध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीची जाहिरात करण्यास मनाई करण्यात आली आहे.
अवधूत साठे यांना सध्याच्या कोर्समध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी गोळा न करण्याचे आणि त्यांच्या अॅकॅडमीशी संबंधित सर्व वेबसाइट्स आणि जाहिराती काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्यात, सेबीने साठे यांच्या ट्रेडिंग अॅकॅडमीवर शोध मोहीम राबवली होती. त्यावेळी त्यांनी असा दावा केला होता की, त्यांचा समूह स्टॉक टिप्स किंवा सल्लागार सेवा प्रदान करत नाही.
अवधूत साठे हे फिनइन्फ्लुएंसर म्हणून ओळखले जातात आणि ते Avadhut Sathe Trading Academy Pvt. Ltd. (ASTAPL) या संस्थेचे प्रमुख आहेत. अलीकडेच भारतीय प्रतिभूति आणि विनिमय बोर्ड (SEBI) ने त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. SEBI च्या आदेशानुसार अवधूत साठे आणि त्यांच्या अकॅडमीला 546.2 कोटी रुपये परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्यावर 3.4 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांना गुमराह करून बिननोंदणी गुंतवणूक सल्लागार व रिसर्च अॅनालिस्ट सेवा दिल्याचा आरोप आहे. या कारवाईनंतर त्यांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारची क्रियाकलाप करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अवधूत साठे हे सध्या चर्चेत असून, गुंतवणूकदारांना चुकीची माहिती देऊन आर्थिक फायदा मिळविल्याचा आरोप त्यांच्यावर सिद्ध झाला आहे.
SL/ML/SL