नारायण राणेंच्या ‘नीलरत्न’ बंगल्यावर कारवाईचे आदेश
सिंधुदुर्ग, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : CRZ कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री व भाजपा खासदार नारायण राणे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. मालवण -चिवला समुद्र किनाऱ्यावर CRZ-2 कायद्याचे उल्लंघन करून बांधलेल्या राणे यांच्या ‘नीलरत्न’ या अलिशान बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
या अनधिकृत बांधकामप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदिप भालेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली होती. यावर सुनावणी घेऊन उच्च न्यायालयाने सदर बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
राणे यांनी अनेक समुद्राजवळच्या जमिनीवर, वन विभागाच्या जमिनीवर, अनेक अनधिकृत बांधकामे बंगले, हॉटेल्सची उभारणी केली आहे, असेही प्रदिप भालेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमुद केले आहे.
SL/KA/SL
13 March 2023